दिल्ली,06 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून गोरक्षेच्या नावावर हत्यांचे प्रमाण वाढले आहे. याच प्रकरणी गोरक्षणाच्या नावाखाली होत असलेल्या हिंसाचारावर सुप्रीम कोर्टानं खडे बोल सुनावले आहेत.
देशभर होणारे असे हिंसाचार थांबवण्यासाठी प्रत्येक राज्यात टास्क फोर्स तयार करावेत, असे आदेश कोर्टानं दिले आहेत. न्यायमूर्ती दिपक मिश्रा यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोडल ऑफिसरचा दर्जा द्यावा, अशी सूचनाही कोर्टानं केली आहे.
आदेश अमलात आणण्यासाठी सुप्रीम कोर्टानं राज्यांना एका आठवड्याची मुदत दिली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 सप्टेंबरला होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा