09 आॅक्टोबर : रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेच्या संस्कृतीत अनेक बदल करायला सुरुवात केलीय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष किंवा सदस्य कुठे गेला की त्यांना घेण्यासाठी तिथल्या महाव्यवस्थापकांना जावं लागायचं. त्यात वेळ आणि बाकीची साधनं खर्च व्हायची. ती प्रथा आता बंद केलीय.
दुसरं असं की रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पहिल्या वर्गात प्रवास करणं आता तितकंसं सोपं नसणार आहे, कारण या अधिकाऱ्यांनी स्लीपर क्लास किंवा थर्ड एसीमधून प्रवास करावा, अशी सूचना काढण्यात आलीय.प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यात यानं मदत होईस, असा रेल्वे मंत्रालयाचा विचार आहे.
रेल्वेमंत्र्यांनी व्हीआयपी संस्कृतीला आळा घालण्यासाठी नेमकी कोणती पाऊलं उचललीयेत?
- रेल्वे अधिकाऱ्यांच्या घरी ट्रॅकमन काम करणार नाहीत, यामुळे 33 हजार ट्रॅकमन रेल्वेच्या कामांसाठी मोकळे झाले आहेत
- उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी फर्स्ट क्लासनं प्रवास करू नये
-स्लीपर किंवा थर्ड एसीतून प्रवास करून प्रवाशांच्या समस्या जाणून घ्याव्यात
- रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना रिसीव करायला कुणीही जाऊ नये
1981 साली बनवलेले नियम बदलण्याचा हा उपक्रम आहे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा