Elec-widget

सार्वजनिक ठिकाणी सिगरेट पिणाऱ्यांनो सावधान! आता होणार जबर दंड

सार्वजनिक ठिकाणी सिगरेट पिणाऱ्यांनो सावधान! आता होणार जबर दंड

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणं आता आणखी महाग पडू शकतं. सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार याबद्दलच्या कायद्यात बदल करणार आहे. या कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना पकडले गेलात तर आता एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणं आता आणखी महाग पडू शकतं. सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार याबद्दलच्या कायद्यात बदल करणार आहे. या कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना पकडले गेलात तर आता एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. सध्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास फक्त 200 रुपये एवढाच दंड आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री केली तर भरभक्कम दंड भरावा लागेल. शाळा, कॉलेजच्या परिसरात तंबाखूजन्य उत्पादवं विकली तरीही दंडाची जोरदार रक्कम भरावी लागणार आहे. शाळा किंवा कॉलेजच्या 100 यार्ड अंतरापर्यंत तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनं विकण्यालाही मनाई करण्यात आली आहे.

'हरभजन तुला लाज नाही वाटत', Chandrayaan-2च्या ट्वीटवर भडकले नेटिझन्स

मागच्या वर्षी सरकारने या दंडातून सुमारे पाच कोटी रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे. अशा प्रकारे दंडाची वसुली करण्यात तामिळनाडू सरकार आघाडीवर आहे. बिहारमध्ये मात्र या दंडाची फारच कमी वसुली झाली आहे. दंड वसूल करण्यामध्ये तामिळनाडूच्या खालोखाल गुजरातचा क्रमांक लागतो.

सार्वजनिक ठिकाणी विडी किंवा सिगरेट पिणं हे दुसऱ्यांसाठी हानीकारक ठरू शकतं. सिगरेट प्यायल्याने त्या व्यक्तीला श्वसनाचे विकार, कर्करोग होण्याचा धोका असतो. पण त्याचबरोबर सिगरेटचा धूर नाकातोंडात गेला तरी त्या व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने ते हानीकारक ठरू शकतं.

Loading...

ज्यांना तंबाखू किंवा सिगरेटचे दुष्परिणाम समजत नाहीत त्या अल्पवयीन मुलांना सिगरेटचं व्यसन लागू नये म्हणून सरकार प्रयत्न करतं आहे. याचाच एक भाग म्हणून शाळा किंवा कॉलेजच्या परिसरात विडी, सिगरेट यासारखी तंबाखूजन्य उत्पादनं विकण्यावर मनाई करण्यात येणार आहे.

======================================================================================

VIDEO : पंतप्रधान मोदींचा हा खास 'मित्र' आहे तरी कोण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 06:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...