S M L

रायझिंग इंडिया हे भारतीयांच्या शक्तीचं प्रतिक-पंतप्रधान मोदी

रायझिंग इंडियाचा अर्थ आहे, आपल्या सर्व नागरिकांचा विश्वास आणि इच्छा वाढवणे. माझ्यासाठी रायझिंग इंडियाचा अर्थ हा लोकांचा आत्मविश्वास वाढवणे आहे

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2018 10:42 PM IST

रायझिंग इंडिया हे भारतीयांच्या शक्तीचं प्रतिक-पंतप्रधान मोदी

16 मार्च : अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं म्हणजे रायझिंग इंडिया, भारताच्या 125 कोटी जनतेचा सन्मान म्हणजे रायझिंग इंडिया अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यूज 18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया समिटचं कौतुक केलंय. दिल्लीत सुरू असलेल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज एकाच व्यासपीठावर आले होते.

न्यूज 18 नेटवर्कने नवी दिल्लीत रायझिंग इंडिया समिटचं आयोजन केलंय. रायझिंग इंडियाचा अर्थ आहे, आपल्या सर्व नागरिकांचा विश्वास आणि इच्छा वाढवणे. माझ्यासाठी रायझिंग इंडियाचा अर्थ हा लोकांचा आत्मविश्वास वाढवणे आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "NO SILOS ONLY SOLUTIONS" हा आमचा उद्देश आहे असं पंतप्रधानांनी नमूद केलं.

तसंच रायझिंग इंडिया हे फक्त दोन शब्द नाही तर सव्वाशे कोटी भारतीयांच्या शक्तीचं प्रतिक आहे जे आता जग स्विकारत आहे. रायझिंग एक असा चेहरा आहे ज्यामुळे भारतीयांना गर्व होईल, भारताने फक्त आपल्याच नाहीतर पूर्ण जगाला विकासाची एक गती दिली असं यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात आपल्या सरकारच्या यशस्वी योजनाचा पाढा वाचला. आरोग्य सेवा लोकांसाठी सुलभ आणि स्वस्त असावी, यासाठी आम्ही अनेक पाऊलं उचलली. 'उज्जवला' योजनेमुळे स्वयंपाक घराचीच नाहीतर अनेक कुटुंबांचं चित्र बदललं आहे. कित्येक महिलांची धुरातून सुटका झाली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही 18 हजार गावांमध्ये वीज नव्हती, यात 13 हजार गावं ही पूर्व भारतातील होती, आम्ही सगळ्यांना वीज दिली, हा आहे रायझिंग इंडिया असं पंतप्रधान मोदींनी अभिमानाने सांगितलं.

2014 मध्ये आमचे सरकार आले तेव्हा वैद्यकीय क्षेत्रात 52 हजार जागा होत्या त्या आता 85 इतक्या वाढल्या आहेत. खरंतर सरकार आणि जनतेच्या सहभागामुळे देशाचा विकास होत असतो आम्ही

कमी वेळेत स्वच्छ भारत अभियान राबवलं आणि हे अभियान जनअभियान झालं हे लोकांनी पाहिलं आणि ते सहभागीही झाले. लोकांच्या इच्छाशक्तीमुळेच देशाचा विकास होऊ शकतो असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी आज पहिल्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल यांनी "द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ राइजिंग इंडिया" आपले परखड मतं मांडली. त्यानंतरच्या दुसऱ्या सत्रात नवी मार्ग नव्या आशा या विषयावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोरहलाल खट्टर सहभागी झाले होते. या वेळी सर्व मंत्र्यांनी त्यांच्या खात्याचं व्हिजन रायझिंग इंडिया कार्यक्रमात विशद केलं. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज रायझिंग इंडियाला हजेरी लावणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2018 10:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close