ना सप्तपदी, ना कन्यादान... 320 रुपयात आटोपला सोहळा; एका लग्नाची अशीही गोष्ट

ना सप्तपदी, ना कन्यादान... 320 रुपयात आटोपला सोहळा; एका लग्नाची अशीही गोष्ट

लग्न म्हणजे धुमधडाका आणि गाजावाजा नसतो, तर अशाही प्रकारे लग्न होतात जी अनोखी असतात

  • Share this:

चंदीगड, 09 मे : लॉकडाऊनमध्ये अनेक लग्नांची चर्चा झाली. काहींनी कमी लोकांमध्ये लग्न केलं. काहींनी घरातचं लग्न केलं, काहीच्या लग्नात तर पोलिसांनीच कन्यादान केलं. मात्र यामध्ये पंजाबमधील हे लग्न वेगळं ठरलं आहे. छोटेखानी लग्न म्हटलं तरी रुढी-परंपरा आल्याच. अगदी सप्तपदीपासून कन्यादानापर्यंत. मात्र या लग्नात असा कोणताच सोहळा झाला नाही.

या लग्नात ना आचारी, ना सप्तपदी, ना सनई आणि नाही कोणत्याही प्रकारची कोर्टाची कागदपत्रे. या जोडप्याने सामाजिक आणि धार्मिक रुढी-परंपरा बाजूला ठेवत एका वेगळ्यात पद्धतीने एकमेकांशी लग्नाची आणि प्रेमाची गाठ बांधली. विशेष म्हणजे या लग्नासाठी केवळ 320 रुपयांचा खर्च झाला. या जोडप्यातील वराचे नाव रणबीर सिंह रंधावा असं आहे तर वधूचं नाव हरदीप कौर आहे. रणबीर पंजाब विद्यार्थी युनियनचा प्रधान आहे. तर त्यांची पत्नी हरदीप कौर कोटाला युनियनची उपप्रधान आहे. हरदीप कौर याच्यावर शाळा, महाविद्यालयाच्या दरम्यान गदरी बाबांचे जीवन, इतिहास, संघर्ष याचा खूप प्रभाव पडला होता. हरदीप कौर यांचं अख्खं कुटुंब कॅनडात स्थायिक आहेत. मात्र कुटुंबाच्या मनाविरोधात तिने कॅनडाचं नागरिकत्वावरुन आपलं नाव हटवलं आणि पंजाबमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

रणबीर आणि हरदीप एकत्र काम करीत असल्याने ते आधीपासून एकमेकांना ओळखत होते. तेव्हा रणबीरला त्याचे अनेक मित्र हरदीप तुझ्यासाठी चांगली जोडी असल्याचे सांगायचे. आम्ही दोघं एकाच युनियनमध्ये काम करीत होतो आणि आमची विचारधाराही एकच होती, त्यामुळे अनेकांनी मला हरदीपशी लग्न करण्याचा आग्रह केला. मात्र तेव्हा आमच्यात चांगली मैत्री होती, लग्न होईल असा विचार केला नसल्याचं रणबीर सांगतो. मात्र दोघांच्याही प्रेमाची गाठ जोडली गेली. आम्ही साध्याच पद्धतीने लग्न करणार असल्याचं ठरवलं होतं. त्यानुसार आम्ही घरातचं लग्न केलं. दोन हार मागवले आणि काही लाडू. बस्स...यासाठी आम्हाला साधारण 320 रुपयांचा खर्च आल्याचे रणबीर सांगतो.

संबंधित -लॉकडाऊनमधील वेदनादायक कहाणी, बापानेच 8 महिन्यांच्या बाळाची निर्घृणपणे केली हत्या

#PGStory : हॉस्टेलच्या दिवसांत मला औषधांसोबत बिअर द्यायचे रुममेट

First published: May 9, 2020, 9:32 AM IST

ताज्या बातम्या