मोठी बातमी : बँक KYC साठी नाही द्यावी लागणार धर्माची माहिती, मोदी सरकारचा खुलासा

मोठी बातमी : बँक KYC साठी नाही द्यावी लागणार धर्माची माहिती, मोदी सरकारचा खुलासा

बँकेच्या KYC साठी धर्माची माहिती द्यावी लागणार नाही, असं स्पष्टीकरण सरकारने दिलं आहे. अर्थ विभागाचे सचिव राजीव कुमार यांनीच हा खुलासा केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : बँकेच्या KYC साठी धर्माची माहिती द्यावी लागणार नाही, असं स्पष्टीकरण सरकारने दिलं आहे. अर्थ विभागाचे सचिव राजीव कुमार यांनीच हा खुलासा केला आहे. याआधी, बँकेच्या KYC साठी धर्माची माहिती द्यावी लागेल, अशी बातमी प्रसारमाध्यमांनी दिली होती.

तुमच्या बँक खात्याच्या 'Know Your Customer' म्हणजेच KYC फॉर्मवर आता तुमच्या धर्माची माहिती द्यावी लागू शकते. यामुळे NRO खातं उघडण्यासाठी किंवा मुस्लिमांशिवाय अन्य धार्मिक अल्पसंख्याक लोकांना मालमत्ता खरेदीसाठी मदत होईल, असं वृत्त देण्यात आलं होतं. भारतीय रिझर्व्ह बँकेने फॉरिन एक्सेंज मॅनेजमेंट रेग्युलेशन मध्ये बदल केले आहेत. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन या सगळ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलाय, असंही यात म्हटलं होतं. पण आता अर्थविभागानेच याचं खंडन केलं आहे.

सध्या KYC मध्ये मागितली जात नाही माहिती

एका बड्या सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक नियंत्रणासाठी बनवल्या गेलेल्या फेमा अॅक्टमध्ये धार्मिक तरतुदी आहेत. सेव्हिंग आणि करंट अकाउंटसाठी KYC फॉर्ममध्ये सध्या धार्मिक माहिती मागितली जात नाही.

(हेही वाचा : PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर जाणून घ्या ही गोष्ट, मोदी सरकारने केले काही बदल)

तज्ज्ञांचं मत काय?

दलाल स्ट्रीट काही बँकिंग तज्ज्ञांना याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्याचवेळी कार्यकर्ते आणि वकिलांनी ही गोष्ट घटनाबाह्य असल्याचं म्हटलं होतं.

=============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2019 09:36 PM IST

ताज्या बातम्या