...तर पाकचे तुकडे होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही : राजनाथ सिंह

पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असून त्यांच्याच देशात मानवाधिकाराचं सर्वाधिक उल्लंघन होत असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2019 10:54 AM IST

...तर पाकचे तुकडे होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही : राजनाथ सिंह

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सीमेवर होत असलेली घुसखोरी आणि दहशतवादाचं समर्थन करण्यावरून ठणकावलं आहे. पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घातलं जात आहे. त्यांनी हे थांबवलं नाही तर पाकचे तुकडे होण्यापासून जगातील कोणतीच ताकद वाचवू शकणार नाही असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला. पाकिस्तानी घुसखोरांच्या कुरापती सुरू राहिल्या तर त्यांना भारतीय लष्कर सोडणार नाही. शनिवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी नागरिकांनी जाऊ नये असं म्हटलं होतं. त्यावर राजनाथ सिंह म्हणाले की, इमरान खान यांनी त्यांच्या नागरिकांना चांगला सल्ला दिला. कारण ते इकडे आलेच तर त्यांना मागे जायला भारतीय सैनिक वेळही देणार नाहीत असा सज्जड दम त्यांनी दिला.

अल्पसंख्यांकांची पाकिस्तानमधील स्थिती वाईट आहे. पाक मानवाधिकाऱाच्या गप्पा करत आहे. मात्र मानवाधिकाराचं सर्वाधिक उल्लंघन त्यांच्याकडेच होतं. भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित होते, आहेत आणि राहतील. पाकिस्तानने मात्र सातत्यानं मानवी हक्क नाकारले आहेत. त्यांचे तुकडे करण्यासाठी इतर कोणत्याही देशाची गरज नाही. पाकने जर दहशतवाद्यांना पाठबळ देणं थांबवलं नाही तर त्यांचे तुकडे होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही असं राजनाथ सिंह म्हणाले.

भारतानं काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय पाकिस्तानला पचत नाहीये. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात धाव घेतली. तिथंही चुकीचं सांगितलं मात्र यातून काहीच निष्पन्न झालं नाही असेही राजनाथ सिंग यांनी सांगितले.

Loading...

पाकिस्तानचा खोटेपणा उघड : Airstrike संदर्भात जगापासून लपवलेल्या सत्याचे पुरावे आले समोर!

VIDEO: जायकवाडी धरण भरलं; नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 10:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...