Home /News /national /

उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं; बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांची कारवाई नाही, दोन पीडित तरुणींची आत्महत्या

उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं; बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांची कारवाई नाही, दोन पीडित तरुणींची आत्महत्या

पोलिसांनी कारवाई तर केलीच नाही उलट आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्याचा दबाव या दोनही तरुणींवर आल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.

    नवी दिल्ली 17 नोव्हेंबर: हाथरस अत्याचाराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे सर्व देशात निघाले होते. पोलिसांनी ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळलं त्यामुळे त्यांच्यावर देशभरातून टीका झाली होती. या घटनेनंतरही पोलिसांच्या कार्यपद्धतीत काहीही बदल झाला नसल्याचं आढळून आलं आहे.  बुलंदशहर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्याची तक्रार त्या मुलीने केली होती. मात्र 15 दिवसानंतरही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे अखेर त्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. या मुलीला भेटण्यासाठी बोलून घेण्यात आले होते. नंतर तीघांनी तिच्यावर अत्याचार केला. यातला मुख्य आरोपी हा मुलीच्या घराशेजारी राहणारा होता असं स्पष्ट झालं आहे. या मुलीने त्याची तक्रार केली आणि त्याचा पाठपुरावाही केला. मात्र आरोपींवर कुठलीच कारवाई झाली नाही. ही तरुणी LLBचं शिक्षण घेत होती. आरोपींवर कुठलीच कारवाई झाली नसल्याचं पीडित मुलीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव होता. पोलीस थातूर मातूर कारण देऊन कारवाई करण्याचं टाळत होती. त्या दबावातून मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. आता पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर प्रकरण चिघळल्याने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात आलं आहे. दुसरी घटनाही उत्तर प्रदेश मधली असून पीडित तरुणीवर ऑगस्ट महिन्यात बलात्कार झाला होता. त्याची तक्रार केल्यानंतरही काहीही कारवाई झाली नाही उलट पीडित तरुणीच्या कुटुंबीयांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. हा दबाव ती तरुणी सहन करू शकली नाही. त्यामुळे तीने स्वत:ला जाळून घेतलं. मंगळवारी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. या दोनही घटनेत पोलिसांनी अक्षम्य दिरंगाई केल्याचं आढळून आलं असून चौकशी अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. मात्र दोनही पीडित मुलींचा जीव गेल्याने उत्त प्रदेश पोलिसांच्या अब्रुचे पुन्हा धिंडवडे निघाले आहेत.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Crime news, Uttar pradesh

    पुढील बातम्या