16 नोव्हेंबर : केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने आपल्या १० नोव्हेंबरच्या आदेशानुसार एसईझेडच्या हद्दीत समुद्रात मासेमारी करणाऱ्या अत्याधुनिक बुल ट्रॉलिंगवर बंदी घातली आहे. तसेच लाईट व एलईडी लाईटद्वारे अत्याधुनिक ट्रॉलिंग मासेमारी करणाऱ्या पर्सिनेट मासेमारी व गिल नेट मासेमारी नौकांवर बंदी घातली आहे. .
जागतिक मच्छीमार दिन सोहळा नवी दिल्ली येथे येत्या १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे. केंद्र सरकारच्या या आदेशाचे अत्याधुनिक बोट मालकांनी पालन केले नाही, तर बेकायदेशीर पर्सिनेट नौका जप्त कराव्यात तसेच बॉटम ट्रॉलर्स मासेमारी नौकांवर नियंत्रण आणावे, अशी मागणीदेखील संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
या निर्णयानंतर मच्छिमार समुद्रात जातात ते अंतरही निश्चित करावं लागणार आहे. शिवाय परराज्यातून येणाऱ्या मासेमारीच्या नौकांवर सरकार कसं नियंत्रण ठेवतंय, हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा