नवी दिल्ली, 05 जून : देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचण आली आहे. अशात अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत कोणतीही नवीन योजना लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने सुरू केलेल्या नव्या योजना या पुढच्या वर्षीपर्यंत थांबवण्यात आल्या आहेत. तर हा नियम पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि स्वावलंबी भारताशी संबंधित योजनांना लागू होणार नसल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
यासंबंधी अर्थ मंत्रालयाने निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार, कोरोनामुळे देश आर्थिक संकटात आहे. त्यामुळे भारत सरकार कॉस्ट कटिंग उपायाअंतर्गत योजना थांबवण्याचा हा निर्णय घेत आहे. पण यामध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि स्वावलंबी भारताशी संबंधित योजना सुरूच राहतील.
सरकारचा मोठा निर्णय
कोव्हिड- 19 मुळे देशात गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अनेक आर्थिक व्यवहार आणि देशांतर्गत उद्योग बंद असल्यामुळे देशाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारनं आर्थिक सुधारणांसह 20 लाख कोटी रुपयांचं एकूण पॅकेज जाहीर केलं.
Published by:Renuka Dhaybar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.