Home /News /national /

आता यापुढे कोणालाच म्हणायचं नाही 'सर' किंवा 'मॅडम'; पंचायतीचा अनोख उपक्रम

आता यापुढे कोणालाच म्हणायचं नाही 'सर' किंवा 'मॅडम'; पंचायतीचा अनोख उपक्रम

सर्वसामान्य नागरिकाला आपल्या कामांसाठी अनेकदा सरकारी कार्यालयं किंवा लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात जावं लागतं. या ठिकाणी नागरिकांना योग्य वागणूक आणि नेमकं उत्तर मिळेल याची खात्री नसते.

    पलक्कड (केरळ), 2 सप्टेंबर : सर्वसामान्य नागरिकाला आपल्या कामांसाठी अनेकदा सरकारी कार्यालयं किंवा लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात जावं लागतं. या ठिकाणी नागरिकांना योग्य वागणूक आणि नेमकं उत्तर मिळेल याची खात्री नसते. अनेकदा शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची अडवणूक केली जाते. त्रास सहन करूनही संबंधित नागरिकांना कामासाठी लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांशी आदराने बोलावं लागतं. हे चित्र वर्षानुवर्षं कायम आहे. लोकशाहीत सर्वसामान्य नागरिक सर्वोच्च पातळीवर असतो आणि लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी जनसेवक असतात याची जाणीव जनतेला ठरावीक वेळी किंवा निवडणूक काळातच होते. यामुळे सर्वच स्तरावर सामाजिक दरी निर्माण झाल्याचं चित्र आहे. ही दरी कमी करण्यासाठी केरळमधल्या (Kerala) माथुर ग्रामपंचायतीने (Mathur Village Panchayat) एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. उत्तर केरळमधल्या पलक्कड (Palakkad) जिल्ह्यातल्या माथुर ग्रामपंचायतीने एक अनोखा उपक्रम सुरू केला असून, या ग्रामपंचायतीने आपल्या कार्यालय परिसरात `सर` आणि `मॅडम` यांसारख्या वसाहतीच्या काळातल्या आदरार्थी शब्दांच्या वापरावर बंदी घातली आहे. सामान्य जनता, लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांमधली दरी भरून काढणं आणि एकमेकांवरचं प्रेम, तसंच विश्वास वाढवणं, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. अशा आदरार्थी शब्दांच्या वापरावर बंदी (Ban) घालणारी माथुर ही देशातली पहिली नागरी संस्था ठरली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या एका बैठकीत सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आला असून, त्याची तातडीने अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून या 16 सदस्यांच्या कॉंग्रेसशासित ग्रामपंचायतीतल्या माकपच्या 7 आणि भाजपच्या एका सदस्याने या आठवड्याच्या सुरुवातीला या संदर्भातल्या ठरावाला पाठिंबा दर्शवला. ग्रामपंचायतीत येणारे नागरिक आणि लोकप्रतिनिधी, तसेच अधिकाऱ्यांमध्ये निर्माण होणारी दरी कमी करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं माथुर ग्रामपंचायतीचे उपसरपंच पी. आर. प्रसाद यांनी सांगितलं. `सर` किंवा `मॅडम` यांसारखे आदरार्थी शब्द ( Respectful Words) हे ब्रिटिश काळाचे अवशेष आहेत, असं ग्रामपंचायत सदस्यांचं म्हणणं आहे. हे ही वाचा-8 लग्न करणारी तरुणी निघाली एड्स बाधित; संपर्कात असलेल्यांचे धाबे दणाणले प्रसाद यांनी सांगितलं, की लोकशाहीत नागरिक सर्वप्रथम असतात. लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी लोकांच्या सेवेसाठी असतात. त्यामुळे लोकांना त्यांची कामं करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विनंती करण्याची गरज नाही. ते सेवा-सुविधांची मागणी लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे करू शकतात, कारण तो त्यांचा अधिकार आहे. सर आणि मॅडम या शब्दांना पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी माथुर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी राजभाषा विभागाकडे केली आहे.
    First published:

    Tags: Kerala

    पुढील बातम्या