बेळगावातील मराठी बांधवांना कानडीची सक्ती करू नका-राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग

बेळगाव-कारवारमधील मराठी जनतेशी मराठीतच व्यवहार करा. सरकारी नोटिस आणि प्रसिध्दीपत्रके मराठीतूनच प्रसिध्द करा' असे आदेश राष्ट्रीय अल्पसंख्याक आयुक्त के.सी. सामरिया यांनी दिले होते. पण कर्नाटक सरकारनं त्याची अंमलबजावणी अजूनही केलेली नाही

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2017 04:59 PM IST

बेळगावातील मराठी बांधवांना कानडीची सक्ती करू नका-राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग

बेळगाव, 17 सप्टेंबर: बेळगावमधील मराठी जनतेवर कानडीची सक्ती करू नका असे आदेश राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने कर्नाटक सरकारला दिले आहेत. तसंच त्यांच्याशी मराठीतच व्यवहार करावा असंही आयोगाचं म्हणणं आहे.

'बेळगाव-कारवारमधील मराठी जनतेशी मराठीतच व्यवहार करा. सरकारी नोटिस आणि प्रसिध्दीपत्रके मराठीतूनच प्रसिध्द करा' असे आदेश राष्ट्रीय अल्पसंख्याक आयुक्त के.सी. सामरिया यांनी दिले होते. पण कर्नाटक सरकारनं त्याची अंमलबजावणी अजूनही केलेली नाही. मराठी भाषिकांच्या याचिका मराठीतूनच स्वीकारल्या जाव्यात आणि त्यांना मराठीतूनच उत्तरं दिलं जावीत असे आदेशही त्यांनी दिले होते. कर्नाटक सरकारनं याची तातडीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिकांनी आता केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 04:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...