"आम्ही छुप्या पद्धतीने काही करणार नाही; गरज वाटली तर पुन्हा LOC पार करू"

लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी स्पष्ट केले की, गरज वाटली तर भारतीय लष्कर पुन्हा एकदा सीमा ओलांडू शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तान(Pakistan)कडून सीमेवर सातत्याने गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकच्या या कुरापतींवर भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत (Bipin Rawat)यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. पाकिस्तान नेहमीच प्रॉक्सी वॉर (छुपे युद्ध) करत असते. पण यासंदर्भात बोलताना रावत यांनी स्पष्ट केले की गरज वाटली तर भारतीय लष्कर पुन्हा एकदा सीमा ओलांडू शकते.

भारताने याआधी केलेले सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike)हा एक मोठा संदेश होता की भारत गरज पडली तर प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडू शकते. सीमेवर तोपर्यंत शांतता असेल जोपर्यंत पाकिस्तान वातावरण बिघडवणार नाही. पाकिस्तानकडून कोणत्याही पद्धतीच्या हलचाली झाल्या तर भारत पुन्हा एकदा सीमा ओलांडू शकते. इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रावत यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिला. उरी हल्ल्यानतंर भारताने 28 सप्टेंबर 2016 रोजी सीमा ओलांडून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर याच वर्षी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने बालाकोट आणि POKमध्ये एअर स्ट्राइक केला होता.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा जिहाद सुरु केला आहे. भारताविरुद्धच्या प्रॉक्सी वॉरचा हा एक भाग आहे. पाकिस्तान सातत्याने त्यांच्या भूमीवर दहशतवाद्यांना अभय देत आहे. ते कधीच काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासंदर्भात बोलत नाहीत. पण काश्मीरमधील दहशतवादाबद्दल ते गप्प बसतात. POKमधील दहशतवाद्यांची ठिकाणे ते सातत्याने बदलत आहेत, असे रावत यांनी सांगितले.

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 10:40 AM IST

ताज्या बातम्या