पैशांऐवजी कांद्यावर डल्ला, 50 हजार रुपये किंमतीचा कांदा लंपास

पैशांऐवजी कांद्यावर डल्ला, 50 हजार रुपये किंमतीचा कांदा लंपास

50 हजार रुपये किमतीचा कांदा लंपास, चोरांचा चक्क पैशांवर नाही तर कांदा-लसणीच्या पोत्यांवर डल्ला.

  • Share this:

कोलकाता, 28 नोव्हेंबर: दुकानातून चोरांनी पैसे किंवा दागिने नाही तर चक्क पोती भरून कांदा चोरीला गेल्याचा धक्कादायत प्रकार समोर आला आहे. एका व्यापाऱ्याच्या दुकानात घुसून चोरांनी कांद्याच्या पोत्यांवर हात साफ केले. या चोरांनी चक्क ड्रॉवरमधील पैशांना हातही लावला नाही. ही घटना कोलकाता इथे मिदनापूर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कांद्याचा विक्रेता असलेल्या अक्षय दास यांनी मोठ्या प्रमाणावर कांद्याचा साठा विकण्यासाठी ठेवला होता. जवळपास 50 हजार रुपये किमतीचा कांदा दुकानात होता. दुकानात पैसेही ठेलेले होते. मंगळवारी सकाळी जेव्हा दुकान उघडण्यासाठी अक्षय दास गेले तेव्हा कांद्याची पोती चोरीला गेली होती आणि पैसे मात्र ड्रॉवरमध्ये तसेच होते. जवळपास 50 हजार रुपयांचा कांदा चोरांनी पळवला होता.

वाचा-'भाजपचा निर्लज्जपणा' : महाराष्ट्र विजयानंतर सोनिया आक्रमक; मोदींवर थेट हल्ला

कांद्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. अवकाळी पावसामुळे बाजारातील कांद्याचे भाव आता 70 आणि 80 रुपयांवरून थेट 150 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर उतरण्याची शक्यता अगदी नगण्य आहे. त्यामुळे कांद्याला मिळणार चढता भाव पाहून चोरांनी पैशांऐवजी कांद्याची चोरी केली. केंद्र सरकारकडून कांदा आयात करण्यात येणार होता. मात्र सध्या कांदा आयात झाला नसल्यानं राज्यात कांद्याचा तुटवडा आहे. त्यामुळे कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत.

कांदा जवळपास सगळ्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा आणि गृहिणींना स्वयंपाकघरात आवश्यक असणार आहे. कांद्याचे भाव वाढल्यानं गृहिणींचं चांगलंच बजेट कोलमडलं आहे. कांदा आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. 15 डिसेंबरपर्यंत कांद्यांच्या भावात घसरण होणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राजस्थान वगळता सर्व राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 28, 2019, 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading