मराठी बातम्या /बातम्या /देश /

आता TRS नाही तर BRS, केसीआर यांची नव्या पक्षासह राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री, काय आहे योजना

आता TRS नाही तर BRS, केसीआर यांची नव्या पक्षासह राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री, काय आहे योजना

KCR news Party BRS: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या पक्षाचे तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

हैदराबाद, 10 ऑक्टोबर : देशाच्या राष्ट्रीय राजकारणात आता आणखी एका प्रादेशिक पक्षाने उडी घेतली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या पक्षाचे तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) केले आहे, पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संयुक्त आघाडी स्थापन करण्यासाठी केसीआर यांनी अनेक विरोधी नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर टीआरएसचे नाव बदलून बीआरएस करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. त्याची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस अध्यक्ष के चंद्रशेखर राव यापूर्वी त्यांच्या कॅम्प ऑफिस आणि अधिकृत निवासस्थानातून टीआरएस मुख्यालय तेलंगणा भवनात पोहोचले होते. वाटेत त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. पक्षाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आणि इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी टीआरएस नवीन पक्षात विलीन करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर हे नवीन नाव पुढे आले आहे.

वाचा - 'सरकार जाणीवपूर्वक अत्याचार करतंय, कारण..'; गंभीर आरोप करत माओवाद्यांचा PFI ला पाठिंबा

आदल्या दिवशी, केसीआर यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह प्रगती भवनमध्ये विजयादशमीच्या निमित्ताने पूजा केली. नवीन पक्षाच्या लाँच कार्यक्रमात, जेडी(एस) नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि त्यांच्या 20 आमदारांनी टीआरएस मुख्यालयात हजेरी लावली. या नवीन नावाने केसीआर यांनी 2024 मध्ये राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची आपली महत्त्वाकांक्षा दर्शवली आहे.

अस्तित्वात आल्यानंतर, बीआरएस हा दोन तेलुगू राज्यांमधील पहिला प्रादेशिक पक्ष असेल ज्याचे राष्ट्रीय पक्षात रूपांतर होईल. नवीन पक्ष बीआरएसच्या निर्णयाचा टीआरएस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. केसीआर यांच्या नव्या राष्ट्रीय पक्षाच्या घोषणेने टीआरएस समर्थकांमध्ये उत्साह आहे. केसीआर समर्थक हातात अनेक बॅनर आणि पोस्टर्स घेऊन रस्त्यावर उतरताना दिसत होते. त्यावर देशाचे नेते के.सी.आर असं लिहिले आहे.

First published:

Tags: Telangana