बाळासाहेब ठाकरेंनाही होती मतदान बंदी, आयोगाने या नेत्यांवर केली होती कारवाई!

बाळासाहेब ठाकरेंनाही होती मतदान बंदी, आयोगाने या नेत्यांवर केली होती कारवाई!

सर्व वाचाळवीरांवर निवडणूक आयोगाने कारवाई केली असली तरी ती पुरेशी नाही असाच सूर आहे. कारण या कारवाईनंतरही अशा वाचाळवीरांची तोंड बंद झालेली नाहीत.

  • Share this:

आकाश गुळाणकर, नवी दिल्ली 16 एप्रिल : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान,भारतीय निवडणूक आयोगाने अमित शाह, बाबा रामदेव आणि आझम खान यांना प्रचार करण्यापासून बंदी घातली होती. निवडणुकीच्या काळात केली जाणारी  दाहक  आणि जातीय भाषणं ही भारतीय निवडणुकांसाठी नवीन नाहीयेत , आणि निवडणूक आयोगसुद्धा या गोष्टींवर कडक कारवाई करू शकलेला नाही.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सभांमध्ये  जातीय  वक्तव्य केल्यामुळे भारतीय निवडणूक आयोगाने  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर ७२ आणि ४८ तासांसाठी प्रचार करण्यास बंदी घातली.

या नेत्यांना फटका

योगी आदित्यनाथ आणि मायावती याच्यावरील कारवाई नंतर निवडणूक आयोगाने ही मोहीम चालू  ठेवत समाजवादी पक्षाचे प्रमुख आझम खान आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनासुद्धा अनुक्रमे ७२ व ४८ तासांसाठी प्रचार करण्यास बंदी घातली. अशा प्रकारची कारवाई निवडणूक आयोगाकडून बऱ्याच वेळेला केली गेलेली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या प्रचाराच्या पद्धतीकडे बघून मतदारांच्या १९९९ मधल्या काही आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या.

बाळासाहेबांवर कारवाई

शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निवडणूक आयोगाने १९९९ ते २००१ या काळात बंदी घातली होती . यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक लढवण्यास आणि पुढील सहा वर्षांसाठी मतदान करण्याच्या  मुलभूत हक्कापासून वंचित ठेवण्यात आले होते. निवडणूक आयोगाने घातलेल्या बंदिमागे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून झालेली  दाहक आणि जातीवाचक भाषणे हे कारण होते. यानंतर २००१ मध्ये त्यांच्यावरील ही बंदी हटवली गेली, आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदान केले.

नेमकं काय झालं?

शिवसेना प्रमुखांनी १९८७ च्या महाराष्ट्र राज्य विधानसभा  उप-निवडणुकीत वादग्रस्त भाषण केले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रमेश प्रभू यांच्याकडून पराभूत झालेले अपक्ष उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी त्यांच्या भाषणाविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर  या गोष्टीची पडताळणी करून बाळासाहेब ठाकरेंवर बंदी घातली.

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची पुन्हा आठवण करून दिली होती. ते म्हणाले कि, ९० च्या दशकाच्या अखेरीस धर्माच्या आधारावर मतं मागण्याच्या आरोपाखाली काँग्रेस सरकारने बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन भारतीय निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र कार्यकारणी आहे जी जाती व धर्माच्या आधारावर राजकारण करण्यास किंवा मत मागण्यास  पूर्णपणे विरोध करते आणि त्यासंदर्भात बऱ्याच नियमांची तरतूद आयोगाकडे आहे.

2014 मध्येही आयोगाची कारवाई

अशाच प्रकारच्या प्रचारावरील बंदीच्या घटना २०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान घडल्या होत्या. भारतीय निवडणूक आयोगाने अमित शहा, बाबा रामदेव आणि आझम खान यांना सदर निवडणुकीमध्ये प्रचार करण्यास बंदी घातली होती. अमित शहा यांना मुस्लीम तर आझम खान यांना हिंदू समुदायाबद्दल भर सभा आणि मेळाव्यांमध्ये वादग्रस्त विधान केल्यामुळे आयोगाने त्यांच्या प्रचारावर बंदी घातली. स्पष्टीकरण देत असताना आयोगाने असे म्हटले की, सदर प्रकारची वक्तव्य ही भारतातील विविध जाती धर्मांच्या भावना दुखावण्याच्या हेतुपूर्ण उद्देशाने केली जात आहेत.

पण लक्षात कोण घेतो

पण अमित शहा यांच्यावरील बंदी ही एका आठवड्यात काढण्यात आली. देशातील प्रसिद्ध योग गुरु बाबा रामदेव यांच्यावर सुद्धा २०१४ च्या निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी बंदी घालण्यात आली.

राहुल गांधींवरील आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांच्यावर ही बंदी घालण्यात आली होती. लखनऊ आणि अहमदाबाद येथे वैयक्तिक आक्षेप घेतल्याने उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश येथील बाबा रामदेव ह्यांच्या प्रचारावर बंदी घातली. त्याचप्रमाणे लखनऊ आणि अहमदाबादल येथील त्यांच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या.

बाबा रामदेव यांनी असे विधान केले होते की, राहुल गांधी हे दलितांच्या घरी मधुचंद्र आणि सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी जातात. या सर्व वाचाळवीरांवर निवडणूक आयोगाने कारवाई केली असली तरी ती पुरेशी नाही असाच सूर आहे. कारण या कारवाईनंतरही अशा वाचाळवीरांची तोंड बंद झालेली नाहीत. 23 मे नंतर या सगळ्यांचाच हिशेब जनता दाखविणार आहे.

First published: April 16, 2019, 5:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading