चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता वाढली; आता शुक्रवारी होणार सुनावणी!

चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता वाढली; आता शुक्रवारी होणार सुनावणी!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अचडणी वाढत चालल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम(P Chidambaram) यांच्या अचडणी वाढत चालल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालया(Delhi High court)नंतर आता सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)ने चिदंबरम यांना झटका दिला आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी जामीनासाठी केलेल्या अर्जावर आता शुक्रवारी सरन्यायाधिश रंजन गोगोई(Chief Justice of India Justice Ranjan Gogoi) यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात चिदंबरम यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे.

चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. पण आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळेच चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. सीबीआय आणि ईडीचं पथक मंगळवारी (20 ऑगस्ट) संध्याकाळी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं, पण तेव्हा ते घरात नव्हते. यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरम यांच्या घराबाहेर नोटीस लावलं. या नोटीसमध्ये पुढील दोन तासांच्या आत हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. सीबीआयचं पथक चिदंबरम यांचा शोध घेत आहेत.

आता चिदंबरम स्वत:हून चौकशीसाठी हजर राहतात की त्यांना अटक केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसची बैठक

चिदंबरम प्रकरणात आता काँग्रेस पक्षाने देखील लक्ष घातले आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. काँग्रेसच्या वॉर रूममध्ये आज बैठक होण्याची शक्यता आहे. कोर्ट चिदंबरम यांच्या संदर्भात काय निर्णय देणार आहे यावर काँग्रेसचे नेते चर्चा करणार आहेत.

राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 05:31 PM IST

ताज्या बातम्या