मराठी बातम्या /बातम्या /देश /BREAKING : लहान मुलांना नसणार कोरोना लस, NTAGI कडून रेड सिग्नल!

BREAKING : लहान मुलांना नसणार कोरोना लस, NTAGI कडून रेड सिग्नल!

आज नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) ची महत्त्वाची बैठक पार पडली.

नवी दिल्ली, 06 डिसेंबर : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यातच लहान मुलांसाठीच्या लशीची (Bharat Biotech vaccine for kids) डोस कधी दिले जातील, याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) ने लहान मुलांना लस देण्याबाबत कोणतीही शिफारस केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना लसीकरणाला देशभरात वेग आला आहे. १८ वर्षावरील वयोगटातील सर्वांना कोरोना लस दिली जात आहे. एकीकडे शाळांची दार उघडी केली जात आहे पण अद्यापही लहान मुलांना कोरोना लस देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

आज  नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) ची महत्त्वाची बैठक पार पडली.  आजच्या या बैठकीत मुलांसाठी अतिरिक्त कोविड डोस आणि लस याबाबत कोणतीही अंतिम शिफारस करण्यात आली नाही, अशी माहिती एनआयए वृत्त संस्थेनं दिली आहे.

अजगरासाठी रोखलं पूर्ण ट्रॅफिक, तरुणीचं होतंय जोरदार कौतुक

दरम्यान, भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीकडून लहान मुलांसाठीची लस तयार करण्यात आली आहे.  2 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस तयार आहे. या लसीच्या पहिल्या तीनही टप्प्यांच्या चाचण्या पार पडल्या असून शेवटची औपचारिकता बाकी आहे.

शिया नेते वसीम रिझवी झाले नारायण सिंह त्यागी, हिंदू धर्मात प्रवेश; वाचा सविस्तर

मात्र लहान मुलांसाठीची ही लस असल्यामुळे कुठलाही धोका न पत्करता सर्व निकषांची वारंवार खातरजमा केल्यानंतरच या लसीला लहान मुलांवर वापर करण्यासाठी परवानगी देण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे. कोव्हॅक्सिनकडून या लसीबाबत सादर करण्यात आलेला डेटा तपासण्याचं आणि त्याचं पृथक्करण करण्याचं काम सध्या सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर लशीच्या वापराला परवानगी मिळू शकणार आहे. पण याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

First published:
top videos