S M L

यंदा सीमेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये मिठाई वाटप नाही

Sachin Salve | Updated On: Jan 26, 2018 10:26 PM IST

यंदा सीमेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये मिठाई वाटप नाही

26 जानेवारी : पाकिस्तानकडून वांरवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्यामुळे यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सीमेवर मिठाई वाटप झालं नाही.

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापत्या सुरूच आहे. अनेक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पाक सैन्याने भारतीय सैनिकांच्या चौक्यावर गोळीबार केला. या चकमकीत मागील आठवड्यात  पाच सुरक्षाकर्मचारी आणि 12 स्थानिक नागरिकांचा मृत्यू झालाय तर 60 हुन अधिक जण जखमी झाले आहे.

याचा निषेध म्हणून भारतीय सैन्याने मिठाई वाटपाचा निर्णय रद्द केला. सीमा सुरक्षा दलाकडून स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानच्या सीमेवरील तैनात सैनिकांना भारताकडून मिठाई वाटप केलं जातं. ही प्रथा यंदा पाकिस्तानचा निषेध म्हणून पाळली गेली नाही. त्यामुळे पाकिस्तान सीमारेषेवर कुठेही मिठाई वाटली गेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2018 10:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close