भारत-पाक दरम्यान कुठेच क्रिकेट सामने होणार नाही : सुषमा स्वराज

भारत-पाक दरम्यान कुठेच क्रिकेट सामने होणार नाही : सुषमा स्वराज

पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध सुधारण्यासंदर्भात भारताने आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे . परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या कि सध्याचे वातावरण पाहता भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकांसाठी अनुकूल परिस्थिती नाही आहे.

  • Share this:

01 जानेवारी: पाकिस्तान आणि भारताच्य दरम्यान कुठेच क्रिकेट मॅच खेळली जाणार नाही  असं वक्तव्य  भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध सुधारण्यासंदर्भात भारताने आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे . परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या कि सध्याचे वातावरण  पाहता भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकांसाठी अनुकूल परिस्थिती नाही आहे. सुषमा स्वराज यांनी याचं कारण पाकिस्तान वारंवार   करत असलेल्या  शस्त्रसंधीचं उल्लंघन असल्याचं सांगितलं आहे.

त्यांनी म्हटलं की सध्या जी परिस्थिती आहे, त्याला पाहता म्हणजेच भारत-पाकिस्तान सोडून इतर ठिकाणी देखील क्रिकेट सिरीज खेळवण्याची परवानगी देऊ शकत नाही.

दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी क्रिकेट संबंध पुन्हा सुधारण्याची मागणी होत होती.

परंतु , सुषमा स्वराज यांचं म्हणणं आहे की एकवेळ आम्ही माणुसकीच्या नात्याने  महिला आणि वृद्ध कैद्यांना सोडण्याचा सल्ला देऊ शकतो, पण सध्या भारत पाकिस्तान मध्ये क्रिकेट संबंध सुरु होण्यासाठी परिस्थिती चांगली नाही.

भारत आणि पाकिस्तान दरम्यान शेवटची क्रिकेट मालिका डिसेंबर २०१२ मध्ये खेळली गेली होती. त्यावेळी पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता . दोन्ही देशांमध्ये त्यावेळी तीन वनडे आणि २ टी- २० सामन्यांची मालिका खेळली गेली होती.

बीसीसीआयने पण इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलला(icc) अनेक वेळा विनंती केली होती की, ग्लोबल टुर्नामेंटमध्ये भारत-पाकला एकाच गटात सामील करू नये.

त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानचे संबंध कुठलं नवं वळण घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2018 05:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading