धक्कादायक! कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह

धक्कादायक! कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसताना एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं डॉक्टरही हैराण झाले आहेत.

  • Share this:

वाराणसी, 25 एप्रिल : देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात कमी वेगानं होत आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 24506 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यातील 5063 जण ठणठणीत झाले असून 775 जणांचा मृत्यू झाला. भारतात गेल्या 24 तासात 1429 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 57 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाची कोणतीच लक्षणं नसताना एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाराणसीच्या यात्रेवरून एक व्यक्ती  येऊन 50 दिवस झाले. तरीही या कालावधीत त्या व्यक्तीमध्ये कोरोनाचे एकही लक्षण आढळले नाही. मात्र त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं डॉक्टर हैराण झाले आहेत. 20 एप्रिलला त्या व्यक्तीला एसएसपींनी विचारले होते तेव्हा यात्रेतून परत येताना एका तबलिही जमातीच्या संपर्कात आल्याचं त्याने सांगितलं होतं. ही माहिती मिळाल्यानंर व्यक्तीची आरोग्य विभागाने तपासणी केली. त्यात कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानं खळबळ उडाली.

हे वाचा : लॉकडाऊनच्या एका महिन्यात तब्बल 70 हजार गुन्हे तर पोलिसांनी इतका वसूल केला दंड!

संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील 18 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोनाची लक्षणं नसतानाही पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. ती व्यक्ती काम करत असलेल्या ठिकाणच्या लोकांनाही क्वारंटाइन केलं आहे. जवळपास 50 ते 60 जणांचे स्क्रिनिंग केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

हे वाचा : कोरोनाबाबत चीनच्या डॉक्टरांचा भारताला सल्ला, Lockdown नंतर काय करायला हवं?

First published: April 25, 2020, 10:13 PM IST

ताज्या बातम्या