21 जून : बाळगंगा धरण गैरव्यवहारप्रकरणी अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण एसीबीने यासंबंधी ईडीला पाठवलेल्या अहवालात गैरव्यवहार झाल्याचं नमूद करण्यात आलंय. धरणाच्या बांधकामात कंत्राटदारांनी वाढ करून शासनाचं तब्बल 92 कोटींचं नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. अजित पवारांच्या काळातच हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
ठाणे एसीबीमार्फत या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. याच बाळगंगा धरण गैरव्यवहाराचा अहवाल ईडीने मागून घेतला होता.त्यावरच एसीबीने आज उत्तर सादर केलंय. 6 जलसंपदा अधिकारी आणि 4 ठेकेदारांसह 11 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
बाळगंगा धरण घोटाळा
काय आहेत आरोप ?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा