जयललिता रूग्णालयात असताना सगळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते!- रूग्णालय प्रशासन

जयललिता रूग्णालयात असताना सगळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते!- रूग्णालय प्रशासन

जयललिता रूग्णालयात उपचार घेत असतानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी त्यांच्या सहकारी शशीकला आणि त्यांचा पुतण्या दिनकरन करून जाहीर करण्यात आला होता. तर शशीकला यांनी जयललिता उपचार घेत असताना त्यांचं चित्रीकरण केलं जातं होतं अशी माहिती दिली होती

  • Share this:

22 मार्च: तामिळ नाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता या 75 दिवस अपोलो रूग्णालयात दाखल असताना रूग्णालयातील सगळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते असा धक्कादायक  खुलासा अपोलो रूग्णालयाचे प्रमुख डॉ प्रताप रेड्डी यांनी केला आहे. यामुळे जयललितांच्य मृत्यूभोवती असलेली  प्रश्नचिन्ह अधिकच गडद झाली आहेत.

जयललिता रूग्णालयात   उपचार घेत असतानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी त्यांच्या सहकारी शशीकला आणि त्यांचा पुतण्या दिनकरन करून जाहीर करण्यात आला होता. तर शशीकला यांनी जयललिता उपचार घेत असताना त्यांचं चित्रीकरण केलं जातं होतं अशी माहिती दिली होती. पण हे सगळेच आरोप रूग्णालय प्रशासनाने खोडून काढले आहे. जयललिता उपचार घेत असताना तिथले सगळेच कॅमेरे बंद होते.तसंच त्यांच्या विशेष वार्डात अजून 24 रूग्णांची क्षमता असूनसुद्धा तिथे फक्त त्या एकट्याच उपचार घेत होत्या. त्या अतिदक्षता विभागात असतानाही त्याचं चित्रीकरण करण्यात आलं नाही असं रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे.

2016 साली  सप्टेंबरमध्ये जयललितांना तब्येत खालवल्यामुळे अपोलो रूग्णालयात दाखल कऱण्यात आले होेते. या रूग्णालयात अखेरपर्यंत त्या उपचार घेत होत्या आणि अखेर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ह्रद्यात बिघाड झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर त्यांचा मृत्यू मृत्यू नसून हत्या असल्याचे आरोप  ओ.पनीरसेल्वम सकट अनेक नेत्यांनी केले होते. त्यासाठी अनेकांनी शशीकलांना दोषीही धरलं होतं.

 

First published: March 22, 2018, 7:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading