Elec-widget

पंतप्रधान मोदींना पुष्पगुच्छ देऊ नका, गृहमंत्रालयाचा आदेश

पंतप्रधान मोदींना पुष्पगुच्छ देऊ नका, गृहमंत्रालयाचा आदेश

पंतप्रधानांचं स्वागत करायचं असेल तर तुम्ही त्यांना एकच फूल किंवा पुस्तक द्यावं असा सल्लाही गृह मंत्रालयाने दिलंय.

  • Share this:

17 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना यापुढे पुष्पगुच्छ देऊ नका असे आदेश गृह मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. पंतप्रधानांचं स्वागत करायचं असेल तर तुम्ही त्यांना एकच फूल किंवा पुस्तक द्यावं असा सल्लाही गृह मंत्रालयाने दिलंय.

गृह मंत्रालयाने सर्व राज्य सरकारच्या मुख्य सचिव आणि केंद्र शासित प्रदेशातील प्रशासनांना याबद्दल एक पत्र पाठवले आहे. या पत्रात पंतप्रधान मोदींना पुष्पगुच्छ देऊ नये असे आदेश दिले असून त्यांचं पालन करावं असंही फर्मावलंय.

पंतप्रधान मोदी जेव्हा कोणत्याही राज्याचा दौरा करतील तेव्हा त्यांना पुष्पगुच्छ भेट दिला जातोय. पण यापुढे केवळ एकच फूल देऊन त्यांचं स्वागत करावं. तसंच जर शक्य झाल्यास खादीचा रुमाल किंवा एखादं पुस्तक भेट देऊन तुम्ही त्यांचं स्वागत करू शकतात असंही गृहमंत्रालयाने म्हटलंय.

विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी एका कार्यक्रमात लोकांना पुष्पगुच्छच्या ऐवजी पुस्तकं देण्याचं आवाहन केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2017 06:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com