Air India ने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; तर या 6 विमानतळावरून उड्डाण होणार नाही!

Air India ने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; तर या 6 विमानतळावरून उड्डाण होणार नाही!

तुम्ही एअर इंडियाने विमान प्रवास करत असाल तर...

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर: देशातील सर्वात मोठी सरकारी तेल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑईल कार्पोरेशन(Indian Oil Corporation) ने एअर इंडिया(Air India) इशारा दिला आहे की, जर 18 ऑक्टोबरपर्यंत थकबाकी जमा केले नाही तर 6 मुख्य विमानतळावरील इंधन पुरवठा बंद केला जाईल. अशा परिस्थितीत जर खरच IOCने इंधन पुरवठा बंद केला तर एअर इंडियाची विमाने उड्डाण कशी करणार हा प्रश्न आहे. एअर इंडियाने प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये देण्याची अट पाळली नाही. याआदी 22 ऑगस्ट रोजी कोच्ची, मोहाली, पुणे, पाटणा, रांची आणि विशाखापट्टनम या सहा विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानांसाठी इंधन पुरवठा बंद करण्यात आला होता. पण त्यानंतर नागरी उड्डयन मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर 7 सप्टेंबरपासून इंधन पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला होता. या सर्व प्रकरणामुळे एअर इंडियाने प्रवास करणाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. कारण जर पैसे दिले गेले नाही तर कोणत्याही क्षणी इंधन पुरवठा बंद होऊ सकतो आणि विमान रद्द होऊ शकते.

यासंदर्भात गेल्याच आठवड्यात बीपीसीएल आणि एचपीसीएल या दोन कंपन्यांनी एअर इंडियाला पत्र लिहून पैसे देण्यास सांगितले होते. या दोन्ही कंपन्यांनी एअर इंडियाला 5 ऑक्टोबर रोजी सांगितले होते की जर पैसे दिले नाही तर 11 ऑक्टोबरपासून इंधन पुरवठा बंद केला जाईल. इंधनापोटी एअर इंडियाने 5 हजार कोटी थकबाकी ठेवली आहे. गेल्या आठ महिन्यापासून ही धकबाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. आठ महीन्यांपूर्वी मिळालेल्या इंधनाचे पैसे एअर इंडियाकडून आता दिले जात आहेत.

इंधन पुरवठा सुरळीत हवा असल्यास एअर इंडियाला 18 ऑक्टोबरपर्यंत धकबाकी जमा करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी एअर इंडियाने इंधन पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपन्यांना विनंती केली आहे की पुरवठा बंद करू नये. अर्थात असे असले तरी एअर इंडियाने धकबाकी कधीपर्यंत दिली जाईल याबाबत कोणतीही ठोस तारीख दिलेली नाही. त्यामुळेच इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपर्यंत वेळ दिली आहे.

अशी आहे एअर इंडियाची अवस्था

> सध्या तोट्यात असलेल्या एअर इंडियावर 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे

> गेल्या आर्थिक वर्षात (2018-19) एअर इंडियाला 8 हजार 400 कोटी रुपयांचा तोट झाला होता

> सरकार एअर इंडियाच्या विक्रीचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीची प्रक्रिया पुढील महिन्यापासून सुरु होऊ शकते.

'बाळ, तुझा पैलवान तयार आहे का?' शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं ओपन चॅलेंज

Published by: Akshay Shitole
First published: October 15, 2019, 1:39 PM IST
Tags: air india

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading