काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची बोलणी निष्फळ, 'वंचित' देणार धक्का!

काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची बोलणी निष्फळ, 'वंचित' देणार धक्का!

' कडूलिंबामध्ये कितीही साखर टाकली तर गोड होत नाही तसा प्रकार वंचित बहुजन आघाडीचा आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आम्ही वारंवार गेलो पण ते बोलायला तयार नाहीत.'

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 29 ऑगस्ट : महाराष्ट्रात अडचणीत असलेल्या काँग्रेसला आणखी धक्का बसणार आहे. कारण वंचित आघाडी काँग्रेससोबत येण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याची कबूली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. दिल्लीत आज काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना त्यांनी ही कबूली दिली. सुरुवातीला छाननी समितीत वडेट्टीवार यांचं नाव घातलेलं नव्हतं. नंतर त्यांनी नाराजी व्यक्त करताच दिल्लीतून सूत्र हलली आणि त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं होतं. मध्य प्रदेश काँग्रसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आजच्या बैठकीत राज्यातल्या सर्व 288 मतदार संघाचा आढावा घेण्यात आला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात असलेल्या वॉर रुममध्ये छाननी समितीची ही पहिलीच बैठक होती. या समितीची दुसरी बैठक आता 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसला वंचितशी आघाडी करायची आहे मात्र त्यांनी अटीच अशा घातल्या आहेत की आघाडी करणं अशक्यच आहे. त्यांना काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छाच नाही अशी टीकाही त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली.

'काट डालूंगा...' नगरसेवकाचा टिक टॉक VIDEO VIRAL

वडेट्टीवार पुढे म्हणाले, कडूलिंबामध्ये कितीही साखर टाकली तर गोड होत नाही तसा प्रकार वंचित बहुजन आघाडीचा आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आम्ही वारंवार गेलो पण ते बोलायला तयार नाहीत. कधी म्हणतात RSS संदर्भात भूमिका जाहीर करा, कधी म्हणतात चाळीस जागा घ्या, तर कधी म्हणतात राष्ट्रवादी सोबत आघाडी तोडा हे कसं चालणार?

राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक पक्ष आहे त्यामुळे त्याला सोडणं कठीण आहे. संघाबद्दल तर आम्हीच स्पष्टच म्हटले होते की त्यांनी पत्रक तयार करावे आम्ही स्वाक्षरी करण्यास तयार तयार आहोत.

आम्ही अनेकदा प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. मला आता वाटत नाही की त्यांच्या सोबत आघाडी होईल.

ज्या पद्धतीने ते वागतात त्यावरून ते राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत येण्यामध्ये इच्छुक नाही असेच लक्षात येते त्यामुळे आम्ही कितीही प्रयत्न केले तर ते यशस्वी होणार नाही असे मला वाटते.

VIDEO: 'शरद पवारांनी तुम्हाला वडिलांसारखी दिलेली वागणूक कुठेच मिळणार नाही’

प्रकाश आंबेडकर यांच्या सोबतचा चर्चांचा आता शेवट झाला आहे आम्ही आता त्यांच्यासोबत आघाडीबाबत सकारात्मक नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससमोर 144 जागांचा प्रस्ताव ठेवलाय. आघाडी करायची असेल तर चर्चेसाठी आमची दारं खुली आहेत मात्र काँग्रेसने लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही सर्व 288 जागांवर आमचे उमेदवार उभे करू असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं होतं. मात्र 144 जागांचा प्रस्ताव काँग्रेस मान्य करणं शक्यच नाही. याची जाणीव आंबेडकरांनाही आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर केवळ वेळकाढूपणा करत असल्याचंही मत व्यक्त केलं जातंय.

विजयी होण्याची शमता असलेल्या उमेदवारांनाच काँग्रेसचे तिकीट देण्यात येईल सोबतच ज्यांना निवडणुकीत पराभूत होऊ अशी शक्यता वाटते तेच शकतात तेच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 03:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading