नवी दिल्ली, 31 मार्च : देशभरात सध्या दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे (Nizamuddin Meet) भीतीचं वातावरण आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते.
नवी दिल्लीच्या निजामुद्दीन भागात परदेशातून आलेल्या बर्याच लोकांच्या संपर्कात आलेल्या स्थानिक लोकांमध्ये कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) संसर्ग पसरल्याचा संशय आहे. त्यामुळे एक हजाराहून अधिक लोकांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. सध्या निजामुद्दीन परिसराची चर्चा संपूर्ण देशभरात सुरू झाली आहे. निजामुद्दीन येथील लोकांमुळे आता दिल्लीसह अनेक राज्यातील चिंता वाढायला लागली आहे.
2 हजाराहून अधिक लोक जमले
राजधानी दिल्लीत 1 मार्च ते 15 मार्च या कालावधीत सुमारे 1830 जणं निजामुद्दीन भागातील परिषदेत सहभागी झाले होते. स्थानिक लोकही यात जोडले गेले तर ही संख्या जवळपास दोन हजारांपर्यंत पोहोचते. दिल्ली किंवा आसपासच्या भागातील सुमारे 500 लोक येथे जमले होते. या कार्यक्रमात श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, इंडोनेशिया, इराण यासह 16 देशांमधील लोक उपस्थित होते. त्याच वेळी, देशातील अनेक राज्यांमधून लोक आले होते. हे नागरिक निजामुद्दीन पोलीस ठाण्याच्या मागील तबलीग-ए-जमातच्या मुख्यालयात थांबले होते.
हाताचे चुंबन घेऊन पसरला कोरोना
निजामुद्दीनमध्ये राहणाऱ्या बर्याच जणांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, लोक तब्लिगी जमातमध्ये येण्यापूर्वीच कोरोना विषाणूचा संसर्ग अनेक देशांमध्ये पसरला होता. स्थानिक लोकांच्या निरीक्षणातील एक गोष्ट अगदी सामान्य होती की, जेव्हा जेव्हा हे लोक एकमेकांना भेटायचे, दुआ-सलामनंतर ते एकमेकांच्या हातांचं चुंबन घेत आणि मिठी मारत असत. या निष्काळजीपणातून संसर्ग अधिक वेगाने पसरत गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निजामुद्दीन परिसरात राहणाऱ्या साधारण 1 हजारांहून जास्त जणांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित -
Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे
दिल्ली पोलिसांनी निजामुद्दीन परिसरात केलेल्या तपासानुसार,
आंतरराष्ट्रीय लोक – 281
आसाम – 216
महाराष्ट्र – 109
तामिळनाडू – 501
उत्तर प्रदेश – 156
मध्य प्रदेश – 107
अंदमान – 21
बिहार- 86
हरियाणा- 22
हिमाचल प्रदेश – 15
हैद्राबाद – 55
कर्नाटक – 45
केरळ – 15
ओदिशा – 15
पंजाब – 9
रांची – 46
राजस्थान – 19
उत्तराखंड – 34
पश्चिम बंगाल – 73
पोलिसांची कारवाई
निजामुद्दीन परिसरातील तब्लिगी जमातच्या अनेक मोठ्या मौलानांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून औपचारिक पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे. परदेशातील लोकांना या परिसरात ठेवल्यानंतर दक्षता बाळगण्यात आली नाही, असेही आरोप आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.