Home /News /national /

धक्कादायक! तबलिगी मरकजमुळे वाढले 60 टक्के कोरोनारुग्ण; 14 राज्यांत पसरला व्हायरस

धक्कादायक! तबलिगी मरकजमुळे वाढले 60 टक्के कोरोनारुग्ण; 14 राज्यांत पसरला व्हायरस

तबलिगी जमातीची सुरुवात 1926 मध्ये मेवात प्रांतात झाली. या जमातीची स्थापना मौलाना मुहम्मद इलियास यांनी केली होती. या जमातीचं मुख्य काम हे संपूर्ण जगभरात इस्लामचा प्रचार आणि प्रसार करणं हे आहे.

तबलिगी जमातीची सुरुवात 1926 मध्ये मेवात प्रांतात झाली. या जमातीची स्थापना मौलाना मुहम्मद इलियास यांनी केली होती. या जमातीचं मुख्य काम हे संपूर्ण जगभरात इस्लामचा प्रचार आणि प्रसार करणं हे आहे.

आरोग्य मंत्रालय आणि दिल्ली सरकारने दिलेले आकडे धक्कादायक आहेत. ICMR च्या मते, निजामुद्दीनची परिषद झाली नसती, तर लॉकडाउनचा परिणाम म्हणून कोरोनाग्रस्तांचा देशातला आकडा 62 टक्क्यांपेक्षा कमी राहिला असता.

    नवी दिल्ली, 3 एप्रिल : दिल्लीच्या निजामुद्दीन इथे झालेली तबलिगी मरकज देशभरात कोरोनाव्हायरचा हॉटस्पॉट (Coronavirus Hotspot) ठरली आहे. या संमेलनात सहभागी झालेले अनुयायी तिथून देशभर हा संसर्ग घेऊन गेले आणि आता अनेक राज्यांमधून या तबलिगी अनुयायांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 14 राज्यांमध्ये तबलिगी जमातशी संबंधित 647 कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. हा आकडा गेल्या दोन दिवसातला आहे. या नव्या कोरोनाग्रस्तांमुळे देशातल्या कोरोनाग्रस्तांची संख्याही एकदम वाढली आहे. वाचा - हातावर होमक्वॉरंटाईनचा शिक्का मारलेले तबलिगी जमातचे 10 जण पुणे जिल्ह्यातून फरार कोरोनाव्हायरचा फैलाव दिल्लीपासून सुरू झाला, पण तो आटोक्यात आहे, असं वाटत असतानाच निजामुद्दीनची घटना समोर आली. या निजामुद्दीन मरकजमुळे दिल्लीत कोरोनारुग्णांची संख्या प्रचंड वाढली. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेले आकडे धक्कादायक आहेत. शुक्रवारी 3 एप्रिलला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 384 कोरोनाग्रस्त आहेत. त्यातले 259 मरकजमध्ये सामील झालेले किंवा त्यांच्या संपर्कातले आहेत. उर्वरित रुग्णांपैकी 58 परदेशी प्रवास करून आलेले आहेत. म्हणजेच दिल्लीत कोरोनाची साथ फैलावली ती या मरकजमुळे. वाचा - फक्त 5 मिनिटांत होणार Coronavirus चं निदान, पोर्टेबल टेस्ट किट लवकरच भारतात दिल्लीत एकूण रुग्णांपैकी तब्बल 67 टक्के रुग्ण तबलिगी जमातचे आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही या आकडेवारीला पुष्टी देणारी माहिती दिली. दिल्लीत हा आकडा मोठा आहेच, पण मरकजनंतर आपापल्या गावी गेलेल्या तबलिगींमुळे कोरोनाव्हायरसचा संसर्ग देशभर पसरला. देशभरात तब्बल 31 टक्के रुग्ण तबलिगी जमातच्या त्या कार्यक्रमामुळे वाढले. 14 राज्यांमध्ये हे रुग्ण गेल्या दोन दिवसात सापडले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. यासंदर्भात नेटवर्क18 ने इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR )इथल्या तज्ज्ञांशी चर्चा केली. ICMR च्या सूत्रांच्या मते, तबलिगी जम्मातची ती निजामुद्दीनची परिषद झाली नसती, तर कोरोनाव्हायरसचा भारतातला फैलाव 62 टक्क्यांपर्यंत कमी झाला असता. ICMR च्या सल्ल्यानेच संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आला होता. या लॉकडाउनचा परिणाम म्हणून खरं तर भारतातल्या कोरोना पॉझिटिव्ह केसेस कमी व्हायला हव्या होत्या. वाचा - पोलिसांची मोठी कारवाई, एकत्र नमाज पठणासाठी गेलेल्या शेकडो नागरिकांना घेतलं ताब्यात पण या परिषदेतून बाहेर पडलेल्या कोरोना संशयितांमुळे याचा फैलाव वाढला. अनेकांनी माहिती लपवल्यामुळे त्यात भर पडली. नाहीतर आत्ता देशातली कोरोनाग्रस्तांची संख्या 62 टक्क्यांपेक्षा कमी बघायला मिळाली असती. ICMR ने कोरोनाव्हायरच्या संक्रमणासंदर्भात एक मॉडेल तयार केलं आहे, त्यानुसार या मरकजच्या रुग्णांमुळे भारतात अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने हा विषाणू पसरला. एप्रिलच्या शेवटी गाठणार कळस कोरोनाग्रस्तांची संख्या भारतात अजूनही इतर काही देशांच्या तुलनेत कमी आहे. ही साथ दुसऱ्या टप्प्यातच असल्याचं यंत्रणांचं म्हणणं आहे. पण ही साथ लॉकडाउन काळ संपल्यानंतर वेगाने फैलावू शकते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेमध्ये कोरोना साथ कळस गाठू शकते, असा ICMR मधील तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतात या साथीचा कहर (Peak of pendemic)मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लॉक डाउन संपलं तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेच लागणार आहेत. देशाचा आकडा 2301, कोरोनाचे 56 बळी देशात कालपासून 336 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे देशातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 2301 झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 56 मृत्यू देशभरात झाले आहेत. त्यातले 12 गेल्या 24 तासांतले आहेत. आतापर्यंत 157 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झालेले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. महाराष्ट्रात कोरोनाबळींची संख्या आणि कोरोनाग्रस्तांचा आकडा सर्वाधिक आहे. अन्य बातम्या 'सतत नका दोष काढू! घरात राहून पणती लावायचीय...' शशांक केतकरची प्रतिक्रिया ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यास सरकार देणार पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या