'शत्रुघ्न सिन्हा हे बिहारची शान', नितिश यांच्या वक्तव्याने वाद

'शत्रुघ्न सिन्हा हे बिहारची शान', नितिश यांच्या वक्तव्याने वाद

शत्रुघ्न सिन्हा हे भाजपची शान आहेत पण आता मी त्यांच्याविरुद्ध प्रचार करणार आहे, असं नितीशकुमार यांनी म्हटलं आहे. आता काँग्रेसमध्ये गेलेल्या शत्रुघ्न सिन्हांचं कौतुक केल्यामुळे नितिशकुमार यांच्या वक्तव्यावरून बिहारमध्ये राजकीय वाद रंगला आहे.

  • Share this:

पाटणा, ३ एप्रिल : शत्रुघ्न सिन्हा हे भाजपची शान आहेत पण आता मी त्यांच्याविरुद्ध प्रचार करणार आहे, असं नितीशकुमार यांनी म्हटलं आहे. आता काँग्रेसमध्ये गेलेल्या शत्रुघ्न सिन्हांचं कौतुक केल्यामुळे नितिशकुमार यांच्या वक्तव्यावरून बिहारमध्ये राजकीय वाद रंगला आहे.

नीतिशकुमार यांच्याशी आपलं व्यक्तिगत भांडण नाही तर ही राजकीय लढाई आहे, असंही नितीशकुमार यांनी स्पष्ट केलं.पण यावरूच राजकीय पक्ष्यांनी त्यांना लक्ष्य केलं.

नितिशकुमार यांचे काँग्रेसशीही चांगले संबंध आहेत याची आठवण काँग्रेस नेते प्रेमचंद मिश्रा यांनी करून दिली.

राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनीही यावर वक्तव्यं केली. राजकारणामध्ये कुणाशीही कायमचे संबंध असू शकत नाहीत पण वैयक्तिक संबंध मात्र निभावले जातात, असं राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

या वादावर भाजपनेही उत्तर दिलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचे विचार जोपर्यंत देशहिताचे होते तोपर्यंत नितिशकुमार यांचे त्यांच्याशी राजकीय संबंध होते. पण आता मात्र शत्रुघ्न सिन्हा यांचे विचार आणि वक्तव्यं देशविरोधी झाली आहेत. त्यामुळेच कोणीही त्यांच्याशी राजकीय संबंध ठेवणार नाही, असं भाजप नेते अजित चौधरी यांनी म्हटलं आहे.

याआधी शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपकडून खासदारकीची निवडणूक लढवली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते.यावेळी मात्र उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नितिशकुमार यांचा जेडीयू हा पक्ष एनडीए चा घटकपक्ष आहे. त्यामुळेच भाजपचे शत्रू आता त्यांचेही शत्रूही व्हायला हवेत, अशी सगळ्याच राजकीय पक्षांची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर नितिशकुमार यांना आता टिकेला तोंड द्यावं लागणार आहे.

========================================================================================================================================================

VIDEO : पार्थबद्दल फेसबुकवर पोस्ट का लिहिली? रोहित पवारांनी दिलं उत्तर

First published: April 3, 2019, 7:21 PM IST

ताज्या बातम्या