पाटणा, 10 ऑगस्ट : बिहारमध्ये (Bihar) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नितीशकुमार यांना भाजपला (bjp) सत्तेवरून खाली ढकलून दिले आहे. आता नितीशकुमार (Nitish Kumar Resigns) यांनी राजदसोबत घरोबा केला आहे. नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील आहे. तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राजकारणामध्ये कधी काय घडेल याचा नेम आता राहिला नाही. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही महाविकासआघाडीचा प्रयोग पुन्हा एकदा झाला आहे. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली असून मंगळवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना भेटून नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. राज्यपालांकडे राजीनामा देतानाच नितीश कुमार यांनी आमदारांच्या समर्थनाचं पत्रही राज्यपालांना दिलं.
Nitish Kumar takes oath as Bihar CM for 8th time, after he announced a new "grand alliance" with Tejashwi Yadav's RJD & other opposition parties pic.twitter.com/btHWJURsul
— ANI (@ANI) August 10, 2022
अखेर आज ठरल्याप्रमाणे नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 21 महिन्यांपूर्वीच नितीशकुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मागील 17 वर्षांमध्ये तब्बल आठव्यांदा नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, हा बिहारमध्ये एका प्रकारे वेगळाच रेकॉर्ड आहे.. नितीशकुमार यांच्यासोबत आरजेडी नेता आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी सुद्धा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
नितीश कुमार यांना कोणाचं समर्थन?
दरम्यान, बिहारच्या राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 7 पक्षांचे 164 आमदार आणि अपक्षांच्या मदतीने बिहारमध्ये महागठबंधन सरकार बनवत असल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं. बिहारमध्ये आरजेडीचे 79, जेडीयूचे 45, काँग्रेसचे 19, डाव्यांचे 16 आणि एक अपक्ष असं 160 चं संख्याबळ आहे. या पक्षांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा दिला आहे.
बिहारचं पक्षीय बलाबल
2020 च्या निवडणुकीत 243 जागांच्या बिहार विधानसभेत एनडीएला 125 जागांवर काठाचं बहुमत मिळालं होतं. भाजपला 74 तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला 43 जागा, विकासशील इनसान पार्टीला 4 आणि हिंदूस्तान आवाम पार्टी सेक्युलरला 4 जागा मिळाल्या होत्या.
दुसरीकडे आरजेडी आणि त्यांच्या घटकपक्षांना 110 जागांवर यश मिळालं होतं. आरजेडी 75 जागांसह बिहारमधली सगळ्यात मोठी पार्टी ठरली. तर काँग्रेसला 19 जागा आणि डाव्यांना 16 जागा मिळाल्या. ओवेसींच्या एमआयएमचे 5 आमदारही बिहारमध्ये निवडून आले, यातले 4 आमदार आरजेडीमध्ये गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.