पाटना,27 जुलै: बिहारमध्ये नितीश कुमारांनी आज सकाळी दहा वाजता राजभवन येथे सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून तब्बल 4 वर्षानंतर जेडीयु-भाजप युती पुन्हा सत्तेत आली आहे .
नितीश कुमारांना बिहारचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी शपथ दिली. सुशील मोदींनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान पंतप्रधान मोदी मात्र शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा