Home /News /national /

BIG NEWS ‘ बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपला देण्याची तयारी होती’  नितीश कुमारांचं मोठं वक्तव्य!

BIG NEWS ‘ बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपला देण्याची तयारी होती’  नितीश कुमारांचं मोठं वक्तव्य!

बिहार विधानसभा निवडणुकीत NDAला 125 जागा मिळाल्या आहेत. भाजपने 110 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्यात 74 जागा त्यांना मिळाल्या.

    पाटणा 15 नोव्हेंबर: बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार पुन्हा (Nitish Kumar) एकदा शपध घेणार आहेत. उद्या सोमवारी (16 नोव्हेंबर)ला शपधविधी होणार आहे. त्याआधी नितीश कुमारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एनडीएच्या बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले, यावेळी माझी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची इच्छा नव्हती. भाजपचा (BJP) मुख्यमंत्री व्हावा असं मला वाटत होतं, मात्र भाजप नेत्यांच्या आग्रहानंतर मी मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. रविवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत (NDA Meeting) त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आली. त्यानंतर नितीश कुमार यांनी घटपक्षांच्या नेत्यांसह राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत. एनडीएला बिहार विधानसभा निवडणुकीत 125 जागा मिळाल्या आहेत. भाजपने 110 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्यात 74 जागा त्यांना मिळाल्या होत्या. तर जेडीयूला मागच्यापेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या. जेडीयूची कामगिरी निराशाजनक राहिली तरीही निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे भाजपने नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची विनंती केली. भाजपला जास्त जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील असं भाजपच्या नेत्यांनी जाहीर केलं होतं. दरम्यान,  नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट असलं तरी गेल्या काही दिवसांमध्ये त्याबद्दल चर्चा रंगली होती. त्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. शपधविधीची तयारी सुरू झाली असून मंत्रिमंडळ कसं असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग, फडणवीस पोहोचले बैठकीला! संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे पाटण्यात दाखल झाल्यानंतर सगळी चक्र वेगात फिरली. रविवारी नितीश कुमार यांची NDAच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर राजनाथ सिंग, नितीश कुमार आणि घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक झाली त्यात मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यात आली आहे. भाजपची संख्या जास्त असल्याने भाजपला मंत्रिमंडळात जास्त जागा आणि महत्त्वाची खाती मिळू शकतात. जेडीयूला कमी जागा मिळाल्याने आता भाजप वरचढ राहणार आहे. तर घटक पक्षांचे किती सदस्य मंत्रिमंडळात असावेत याबाबत चर्चा सुरू असून संध्याकाळी सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यांना त्यांच्या संख्याबळाच्या प्रमाणात पदं मिळणार आहेत.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Nitish kumar

    पुढील बातम्या