पाटणा, 4 जुलै : बिहारच्या प्रशासनात Coronavirus ने हाहाकार माजवला आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच बिहारच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम विधानपरिषदेत झाला. आता विधानसभेचे सभापती अवधेश नारायण सिंह हे स्वतःच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. स्वतः मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी टेस्ट करून घेतली आहे. त्यांच्या चाचणीचे रिपोर्ट येणं बाकी आहे.
बिहार विधानपरिषदेत नव्याने निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी दोन दिवसांपूर्वी झाला. त्यांना शपथ देणाऱ्या सभापती अवधेश सिंह यांची COVID चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शपथविधीच्या कार्यक्रमात नितीश कुमार सभापतींच्या अगदी निकट बसले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली आहे. त्याबरोबरच उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि अन्य काही बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची सँपल्सही चाचणीसाठी घेण्यात आली आहेत.
'तो देखावा नव्हे' मोदींविरुद्धच्या #MunnaBhaiMBBS टॅगवर लष्कराचं स्पष्टीकरण
शपथविधी कार्यक्रमात अवधेश यांच्यासमवेत मुख्यमंत्री नितीश कुमार होते. शिवाय दुसऱ्या बाजूला विधानसभेचे सभापती विजय नारायण चौधरी होते आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदीसुद्धा होते.
बापरे! कोरोना व्हायरस झाला आणखी धोकादायक, आढळून आलं ‘हे’ धक्कादायक वास्तव
शनिवारी अवधेश नारायण सिंह यांच्याबरोबर त्यांच्या साऱ्या कुटुंबीयांचा कोविड चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. त्यांच्या असिस्टंटचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. एकाच वेळी बिहारच्या प्रशासनातील सर्वोच्च मंत्री आणि अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. सुरुवातीला दोन चाचण्यांमध्ये अवधेश यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आली अशी बातमी News18 हिंदीने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.