मराठी बातम्या /बातम्या /देश /बिहारच्या राजकारणात पुन्हा खळबळ! नितीश कुमार परत भाजपच्या संपर्कात?

बिहारच्या राजकारणात पुन्हा खळबळ! नितीश कुमार परत भाजपच्या संपर्कात?

जुलै महिन्यामध्ये नितीश कुमार यांनी बिहारमध्ये राजकीय भूकंप करत भाजपची साथ सोडली.

जुलै महिन्यामध्ये नितीश कुमार यांनी बिहारमध्ये राजकीय भूकंप करत भाजपची साथ सोडली.

जुलै महिन्यामध्ये नितीश कुमार यांनी बिहारमध्ये राजकीय भूकंप करत भाजपची साथ सोडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Patna, India

पटणा, 19 ऑक्टोबर : जुलै महिन्यामध्ये नितीश कुमार यांनी बिहारमध्ये राजकीय भूकंप करत भाजपची साथ सोडली. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत युती करत सरकार बनवलं. या सरकारमध्ये नितीश मुख्यमंत्री तर लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. नितीश कुमार यांच्या नव्या सरकारला तीन महिने पूर्ण होत नाहीत, तोच नवा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

नितीश कुमार भाजपच्या संपर्कात आहेत, जर परिस्थिती निर्माण झाली तर ते पुन्हा भाजपसोबत युती करू शकतात, असा खळबळजनक दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे. राजकीय रणनीतीकार म्हणून ओळख मिळवलेले प्रशांत किशोर हे काही काळ जेडीयू पक्षामध्ये होते.

प्रशांत किशोर यांचा हा दावा जेडीयूने फेटाळून लावला आहे. प्रशांत किशोर अशी वक्तव्य करून भ्रम निर्माण करत आहेत, असं जेडीयूकडून सांगण्यात आलं. प्रशांत किशोर हे सध्या बिहारमध्ये पदयात्रा करत आहेत. प्रशांत किशोर यांची ही यात्रा सक्रीय राजकारणात यायचं पाऊल म्हणून बघितली जात आहे.

'नितीश कुमार यांनी जेडीयू खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या माध्यमातून भाजपसोबत संवादाचा मार्ग मोकळा ठेवला आहे,' असं प्रशांत किशोर म्हणाले. हरिवंश यांनी याबाबत प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे, पण जेडीयूने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत, तसंच नितीश कुमार भाजपशी परत कधीच हातमिळवणी करणार नाहीत, असंही जेडीयूने स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले प्रशांत किशोर?

'नितीश कुमार राष्ट्रीय महागठबंधन बनवण्यासाठी आग्रही आहेत, पण त्यांनी भाजपसोबत चर्चेचा दरवाजा उघडा ठेवला आहे. ते खासदार आणि राज्यसभा उपसभापती हरिवंश यांच्या माध्यमातून भाजपच्या संपर्कात आहेत. जेडीयू-भाजप वेगळे झाले, तरी हरिवंश यांनी राजीनामा दिला नाही. परिस्थिती निर्माण झाली तर नितीश पुन्हा भाजपसोबत जातील,' असं विधान प्रशांत किशोर यांनी केलं.

जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी प्रशांत किशोर यांच्यावर पलटवार केला आहे. नितीश कुमार यांनी आपण पुन्हा भाजपसोबत जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. नितीश कुमार 50 वर्षांपासून राजकारणात आहेत, तर प्रशांत किशोर फक्त 6 महिने. भ्रम निर्माण करण्यासाठी ते अशी वक्तव्य करत आहेत, अशी प्रतिक्रिया केसी त्यागी यांनी दिली.

First published:

Tags: BJP, Nitish kumar