ममता बॅनर्जींसाठी प्रशांत किशोर करणार 'चाणक्य'चं काम; नीतीश कुमार देणार परवानगी?

Mamata Banerjee : प्रशांत किशोर तृणमुल काँग्रेससाठी रणनीतीकारचं काम करणार आहेत. पण, त्यांना नीतीश कुमार परवानगी देणार का?

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 12:49 PM IST

ममता बॅनर्जींसाठी प्रशांत किशोर करणार 'चाणक्य'चं काम; नीतीश कुमार देणार परवानगी?

नवी दिल्ली, 07 जून : लोकसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2021 विधानसभा निवडणुकीकरता कंबर कसली आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी, नितीश कुमार यांच्यासाठी चाणक्यची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर ममतांना मदत करणार आहेत. ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांच्यात गुरूवारी तब्बल दोन तास चर्चा झाली. या चर्चेअंती प्रशांत किशोर तृणमुल काँग्रेससाठी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखणार आहेत. कोलकातामध्ये ही बैठक पार पडली.

पण, ममता बॅनर्जींसोबत काम करण्यासाठी प्रशांत किशोर यांना नीतीश कुमार परवानगी देणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी पाटणा आणि दिल्लीमध्ये नीतीश कुमार यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रशांत किशोर ममता बॅनर्जींसाठी काम करणार असल्याचं बोललं जात होतं.


पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क; न्यायालयाचा निर्णय

का असेल नकार

Loading...

प्रशांत किशोर हे जेडीयुचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे अध्यक्षाच्या परवानगीशिवाय त्यांना अशा प्रकारचं कोणतंही काम करता येमार नाही अशी माहिती जेडीयुचे प्रवक्ता अजय अलोक यांनी न्यूज18 नेटवर्कशी बोलताना दिली. नीतीश कुमार यांच्या परवानगीशिवाय प्रशांत किशोर यांना ममता बॅनर्जींसाठी काम करता येणार नाही ही गोष्ट देखील स्पष्ट आहे.


रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारनं उचललं हे पाऊल

2014मध्ये बजावली महत्त्वपूर्ण भूमिका

प्रशांत किशोर यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची रणनिती आखली. त्यानंतर भाजपला 2014मध्ये केंद्रात सत्ता मिळाली. तर, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. 2014मध्ये देखील भाजपनं चांगलं यश मिळवलं होतं. त्यानंतर प्रशांत किशोर यांच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या.

दुसरीकडे प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासाठी देखील कामं केलं. त्यावेळी देखील जेडीयुनं राज्यात सत्ता मिळवली. तर, नितीश कुमर बिहारचे मुख्यमंत्री झाले. प्रशांत किशोर यांची कामगिरी पाहता त्यांच्याकडे आता ममता बॅनर्जी यांनी देखील हात पुढे केला आहे.

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसचं संख्याबळ घसरलं. तर, भाजपनं मात्र मुसंडी मारली. हे सारं चित्र पाहता ममता बॅनर्जी 2021मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरता कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाहीत. त्याची तयारी त्यांनी आतापासून केली आहे. त्यासाठी त्यांनी रणनीतीकार प्रशांत किशोर यांची मदत घेतली आहे.


रणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 12:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...