31 डिसेंबर: गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दुर करण्यात भाजपला यश आलं आहे. त्यांच्या मागण्या मंजूर करून हा तात्पुरता अंतर्गत कलह भाजपने सोडवला आहे.
गुजरातचे उपमुख्यमंत्री यांना उर्जेचं खातं आणि अजून काही छोटीखानी खाती देण्यात आली होती. पण त्यांना अर्थमंत्रालय हवं होतं. गुजरातमध्ये अर्थमंत्रालय सगळ्यात प्रतिष्ठेचं मानलं जातं. हे मंत्रालय सौरभ पटेल यांना देण्यात आलं होतं. आपल्याला साजेसं मंत्रालय मिळालं नाही म्हणून नितीन पटेल नाराज होते. आपली नाराजी त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यांना अमित शहांनी तुमच्या मागण्या मंजूर होतील असं आश्वासन देऊन सांगितलं होतं.याप्रकरणी भाजपमध्ये फूट पडू शकणार होती. तेव्हा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी हस्तक्षेप केला. अमित शहांच्या हस्तक्षेपानंतर नितीन पटेल यांना हवं असलेलं अर्थमंत्रालय मिळालं.तसंच सौरभ पटेल यांच्याकडचं अजून एक मंत्रालय कमी झालं आहे.
नितीन पटेल नाराज झाल्यानंतर हार्दिक पटेलने नितीन पटेलांना समर्थन दिलं होतं. नितीन पटेल जर 10 आमदारांसकट सत्तेतून बाहेर पडले तर कांग्रेससोबत येऊन त्यांना सत्ता स्थापन करत येईल असंही हार्दिक पटेल म्हणाला होता. तेव्हा खरोखर आता सत्ता पडते की काय अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होत होती. पण अखेर हे प्रकरण मिटलं असून भाजपचीच सत्ता कायम राहणार असल्याचं समोर आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा