महिलांसाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा; घरबसल्या महिन्याला कमावू शकता 20000 रुपये

महिलांसाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा; घरबसल्या महिन्याला कमावू शकता 20000 रुपये

दररोज तास काम केल्यास महिन्याला 20000 पर्यंत कमावू शकता, असे नितीन गडकरी यांनी सांगितले

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. परिणाम अनलॉक पूर्णत: करण्यात आला नसून अंशत: विविध आस्थापनं खुली करण्यात येणार आहे.

कोरोनानंतर आयुष्यात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान समाजातील वागणूक यासह कामामध्येही मोठा बदल घडू शकतो. कोरोनाच्या काळात अनेक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता हळूहळू त्या खुल्या होत आहेत. मात्र अनेक कंपन्यांनी वेतनकपातीसह अनेक कामगारांना कामावरुन कमी केले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना घरातून लघुउद्योग आदी सुरू करण्याची गरज निर्माण होणार आहे.

तर दुसरीकडे एमएसएमईमध्ये मोठा बदल होऊ शकतो.

राज्याचे MSME मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. यावेळी गडकरी म्हणाले की, - 10 लाख महिलांना आम्ही सोलर चरखा देणार आहोत. या सोलर चरख्यावर दररोज 4 तास काम केल्यानंतर प्रत्येक महिन्याला महिलेला 20000 पर्यंत रोजगार मिळू शकतो. हे सूत आमचे मंत्रालय खरेदी करेल, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यामुळे महिलांच्या हाताला कामही मिळेल, आणि कोरोनाच्या संकटात घर चालविण्यासाठी त्यांचा मोठा हात असेल.

देशात कोरोनाच प्रादुर्भाव असताना ही घोषणा अनेक कुटुंबासाठी उपयुक्त ठरणार आहे. यातून त्यांना घरबसल्या कमावणे शक्य होणार आहे.

 

संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

 

 

Published by: Meenal Gangurde
First published: July 6, 2020, 7:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading