Home /News /national /

नितीन गडकरी घेणार हायड्रोजनवर चालणारी गाडी; इलेक्ट्रिक वाहनांबद्दल दिली महत्त्वाची माहिती

नितीन गडकरी घेणार हायड्रोजनवर चालणारी गाडी; इलेक्ट्रिक वाहनांबद्दल दिली महत्त्वाची माहिती

ग्रीन हायड्रोजन इंधनाचे भारतातील भविष्य काय असेल याबाबत बोलताना गडकरी म्हणाले, मी स्वतः पुढील महिन्यात एक अशी गाडी विकत घेणार (Nitin Gadkari to buy Hydrogen fuel car) आहे जी हायड्रोजन इंधनावर चालेल

नवी दिल्ली 23 नोव्हेंबर : गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे हायड्रोजन इंधनाबाबत (hydrogen fuel) बोलताना दिसून येत आहेत. पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून अवघ्या ५० ते ६० रुपयांमध्ये हे इंधन उपलब्ध होईल असं त्यांनी मागेही स्पष्ट केलं होतं. यानंतर आता याबाबत स्वतःच पुढाकार घेत, पुढील महिन्यात आपण हायड्रोजन फ्युअलवर (hydrogen fuel car) चालणारी गाडी घेणार असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (ICC) एका कार्यक्रमाला नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे व्हर्चुअली संबोधित करत होते. सोमवारी झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी म्हटलं, की केंद्र सरकार हे मोठ्या प्रमाणात आणि जलदगतीने इलेक्ट्रिक वाहने (Electric vehicles in India) स्वीकारण्याच्या तयारीत आहे. यासोबतच पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉल, बायो-एलएनजी आणि ग्रीन हायड्रोजन (Green Hydrogen) अशा पर्यायी इंधनांचा वापरही वाढवण्यावर सरकारचा जोर आहे. यावेळी ग्रीन हायड्रोजन इंधनाचे भारतातील भविष्य काय असेल याबाबत बोलताना ते म्हणाले, “मी स्वतः पुढील महिन्यात एक अशी गाडी विकत घेणार (Nitin Gadkari to buy Hydrogen fuel car) आहे जी हायड्रोजन इंधनावर चालेल.” यावरूनच सरकार किती वेगाने इंधनात क्रांती आणण्याचा विचार करत आहे हे लक्षात येते. इतर वाहनांची सक्ती नसेल यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, की सरकार जरी पर्यायी इंधनाचा विचार करत असले तरी पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन सुरूच राहणार आहे. इलेक्ट्रिक, हायड्रोजन किंवा अन्य इंधनांवर चालणाऱ्या गाड्यांची सक्ती (Electric cars in India) करण्याची गरज नाही. तसेच, इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी सुमारे 250 स्टार्टअप (Electric vehicles start-ups) सुरू झाले आहेत. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होऊ शकतात. तसेच, विमानात वापरल्या जाणाऱ्या एटीएफ इंधनामध्येही 50 टक्के इथेनॉलच्या (Ethanol in Airplane fuel) वापरासही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. झी न्यूजने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. हायड्रोजन इंधन हे पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत अधिक स्वच्छ (Hydrogen is safer than petrol) आणि अधिक ऊर्जा देणारं (Hydrogen Fuel more powerful) इंधन आहे. एक किलो हायड्रोजन गॅसमध्ये नॅचरल गॅसच्या तुलनेत 2.6 टक्के अधिक एनर्जी असते. ही ऊर्जा साठवून ठेवली जाऊ शकते, आणि गरजेनुसार वापरताही येते. जर हे इंधन बनवण्याची प्रक्रिया अधिक स्वस्त झाली, तर हा पेट्रोल-डिझेलला एक उत्तम पर्याय (Hydrogen fuel is a better option) उपलब्ध होऊ शकतो. हायड्रोजनची स्वस्तात निर्मिती कऱण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. आयआयटी गुवाहाटीमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने पाण्यातील ऑक्सिजन आणि हायड्रोजनला वेगळे करण्याबाबत संशोधन सुरू आहे. एकूणच, देशातील हायड्रोजन-इंधन युगाची सुरूवात गडकरी स्वतःपासूनच करणार आहेत. यामुळे लोकांमध्ये हायड्रोजन इंधनाप्रती विश्वास वाढण्यास मदत होईल. तसेच, काही दिवसांमध्ये हे इंधन स्वस्तात उपलब्ध झाल्यास ते पेट्रोल-डिझेलला एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
First published:

Tags: Electric vehicles, Nitin gadkari

पुढील बातम्या