• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पैसे वाचवण्याच्या नादात होतात 50 टक्के रस्ते अपघात; नितीन गडकरींनी सांगितला प्रमाण घटवण्यासाठीचा प्लॅन

पैसे वाचवण्याच्या नादात होतात 50 टक्के रस्ते अपघात; नितीन गडकरींनी सांगितला प्रमाण घटवण्यासाठीचा प्लॅन

नितीन गडकरी म्हणाले, की 50 टक्के रस्ते अपघात हे इंजिनिअरिंगसंबंधीच्या अडचणींमुळे होत असतात. पैसे वाचवण्याच्या नादात सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट (Detailed Project Report) तयार करणारे लोक दर्जाकडे दुर्लक्ष करतात

 • Share this:
  मुंबई 18 जून : राज्यात आणि देशभरात अपघातांचं (Road Accidents) प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यात अनेकांना आपला जीव गमावावा लागत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी नुकतंच याबाबतची माहिती दिली आहे. नितीन गडकरी म्हणाले, की 50 टक्के रस्ते अपघात हे इंजिनिअरिंगसंबंधीच्या अडचणींमुळे होत असतात. पैसे वाचवण्याच्या नादात सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट (Detailed Project Report) तयार करणारे लोक दर्जाकडे दुर्लक्ष करतात आणि अनेक ब्लॅक स्पॉट तयार होतात. मुंबईत मुसळधार पावसात पुन्हा दुर्घटना; भिंत कोसळून एकाचा मृत्यू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्चुअल पद्धतीनं घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. पुढे त्यांनी सांगितलं, की हे ब्लॉक स्पॉट कमी करण्य़ासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. रस्ते अपघातासाठी 15 ते 20 टक्के चालक जबाबदार असतात. तर, 10-15 टक्के प्रकरणांमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअर या अपघातांसाठी जबाबदार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. मुंबई, ठाण्यात पुढील 3 तास मुसळधार पावसाचे, हवामान विभागाकडून अलर्ट रस्ते अपघातांचं वाढतं प्रमाण पाहता सरकार या दिशेनं महत्त्वाची पाऊलं उचलण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या योजनेबाबत माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले, 2024 पर्यंत रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 50 टक्क्यांनी घटवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. म्हणजेच पुढील तीन वर्षांमध्ये याकडे विशेष लक्ष दिलं जाणार असून यामुळे रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण घटण्यात मोठा फायदा होणार आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: