एकदा हप्ता चुकवला म्हणून लगेच विजय माल्या फ्रॉड कसा झाला : नितीन गडकरी

एकदा हप्ता चुकवला म्हणून लगेच विजय माल्या फ्रॉड कसा झाला : नितीन गडकरी

विजय माल्यासारख्या उद्योजकावर त्याच्या एखाद्या आर्थिक अपराधाबद्दल लगेच गुंड असल्याचा शिक्का मारणं बरोबर नाही, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : विजय माल्यासारख्या उद्योजकाला त्याच्या एखाद्या आर्थिक अपराधाबद्दल त्याच्यावर लगेच गुंड असल्याचा शिक्का मारणं बरोबर नाही, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय.

एकीकडे किंगफिशरचा विजय माल्या देशात परत यावा यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे सरकारमधलेच एक वरीष्ठ मंत्री मात्र माल्याची तरफदारी करत आहेत, याबाबत बँकिंग, बिझनेस आणि सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलंय. नितीन गडकरी म्हणाले,  "40 वर्षं विजय माल्या रेग्युलर पेमेंट करत होता, व्याज देत होता. 40 वर्षांनंतर तो एव्हिएशनमध्ये आला. त्यानंतर त्याच्या अडचणी सुरू झाल्या. अडचणीत आला म्हणजे काय लगेच चोर झाला का? जो पन्नास वर्ष नियमित व्याज भरत आलाय तोपर्यंत ठीक आहे, पण त्यानंतर एकदा त्यानं ते चुकवलं, तर लगेच तो फ्रॉड झाला? ही मानसिकता काही बरोबर नाही."

माझे सारे पैसे घ्या पण मला चोर म्हणू नका- विजय माल्ल्या9000 कोटींचं कर्ज बुडवल्याबद्दल आणि आर्थिक घोटाळा केल्याबद्दल विजय माल्या भारतीय अधिकाऱ्यांसाठी मोस्ट वाँटेड गुन्हेगार आहे. कारवाईच्या भीतीनं भारतातून पळून जाऊन त्यानं ब्रिटनमध्ये आश्रय घेतला होता. ब्रिटनच्या कोर्टानं नुकतीच विजय माल्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली आहे. आता कुठल्याही दिवशी विजय माल्याला भारतात परतणं भाग आहे.

विजय माल्याशी काही माझं वैयक्तिक देणं-घेणं नाही, असं सुरुवातीलाच सांगत गडकरी म्हणाले, "जो माणूस अडचणीत येतो त्याच्यावर जर आपण तो फ्रॉड असल्याचा शिक्का मारत असू तर हे आपल्या इकॉनॉमीला पुढे नेणारं नाही. ही मानसिकता आपल्या अर्थव्यवस्थेला मारक आहे."

एक गलती का सबको अधिकार है पर वो बोनाफाइड होनी चाहिये, असंही ते म्हणाले. इंडिया इकॉनॉमिक कान्क्लेव्हमध्ये गडकरी बोलत होते.

पवारांना अजूनही राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नाही का? - SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2018 06:10 PM IST

ताज्या बातम्या