'आम्ही चांगलं काम केलं नसेल तर ...' गडकरींचं आणखी एक खळबळजनक विधान

'आम्ही चांगलं काम केलं नसेल तर ...' गडकरींचं आणखी एक खळबळजनक विधान

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एक मोठं विधान केलं आहे. आमच्या सरकारने चांगलं काम केलं नसेल तर दुसऱ्यांना संधी मिळेल, असं ते म्हणाले. मतदारांनी गेल्या पाच वर्षांतलं सरकारचं काम बघूनच मतदान केलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 एप्रिल : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एक मोठं विधान केलं आहे. आमच्या सरकारने चांगलं काम केलं नसेल तर दुसऱ्यांना संधी मिळेल, असं ते म्हणाले. मतदारांनी गेल्या पाच वर्षांतलं सरकारचं काम बघूनच मतदान केलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

याआधी नितीन गडकरींची अनेक वक्तव्यं गाजली आहेत. त्यातली काही वादग्रस्तही ठरली. त्यांच्या या वक्तव्यामुळे नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत का ?यावरही जोरदार चर्चा रंगली. आता त्यात गडकरींच्या या विधानाची भर पडली आहे.

सरकारचं काम समाधानकारक नाही, असं जर मतदारांना वाटलं तर दुसऱ्या पक्षाला संधी मिळते. सरकारने चांगलं काम केलं असेल तरच त्यांना दुसऱ्या वेळी सत्तेत येण्याची संधी दिली पाहिजे, असं गडकरींनी म्हटलं. मतदान सुरू व्हायला काही दिवस उरले असताना एका वरिष्ठ केंद्रीय मंत्र्याने केलेल्या या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

याआधी गडकरींनी केलेल्या वक्तव्यांवरून ते थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत आहेत का, असंही बोललं जात होतं. आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांच्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

पुलवामा हल्ल्याचं राजकारण करणं योग्य नाही. आम्ही त्याचं श्रेय घेऊ इच्छित नाही, असंही याआधी नितीन गडकरी म्हणाले होते.

काही दिवसांपू्र्वी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे, असं म्हटलं होतं. आम्ही देशात ३०० पेक्षा जास्त जागा जिंकू, असा दावाही त्यांनी केला.

आमचा पक्ष एका व्यक्तीवर अवलंबून नाही. आमच्या पक्षात सर्वजण विचारविनिमय करूनच निर्णय घेतात. त्यामुळे अमित शहा आणि नरेंद्र मोदी हेच पक्ष चालवतात हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे, असं स्षष्टीकरण गडकरींनी दिलं होतं.

============================================================================================================================================================

VIDEO : काँग्रेसला देशात 2 पंतप्रधान हवेत - नरेंद्र मोदी

First published: April 6, 2019, 9:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading