'गडकरींना करा उपपंतप्रधान... अमित शहांच्या जागी 'या' नेत्याला करा अध्यक्ष', भाजपच्या माजी मंत्र्याची मागणी

'गडकरींना करा उपपंतप्रधान... अमित शहांच्या जागी 'या' नेत्याला करा अध्यक्ष', भाजपच्या माजी मंत्र्याची मागणी

'भाजपला 2019 मध्ये सत्तेत यायचं असेल तर पक्षातील नेत्यांच्या कामात बदल करायला पाहिजे. देशात असलेल्या इतर महत्त्वाच्या प्रश्नांचा विसर पडला असून पक्ष धर्माच्या मुद्द्यावर जास्त वेळ घालवत आहे'

  • Share this:

नवी दिल्ली, 6 जानेवारी : 'देशाला 2050 पर्यंत अनेक मराठी पंतप्रधान मिळतील,' असं विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवरच आता भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्याने केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे. नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान आणि शिवराजसिंह चौहान यांना भाजपचे अध्यक्ष करावं, अशी मागणी दलित नेते संघप्रिय गौतम यांनी केली आहे. यामुळे भाजपमध्ये पक्षनेतृत्वाबद्दल नाराजी वाढल्याची चर्चा सुरू आहे.

'भाजपला 2019 मध्ये सत्तेत यायचं असेल तर पक्षातील नेत्यांच्या कामात बदल करायला पाहिजे. देशात असलेल्या इतर महत्त्वाच्या प्रश्नांचा विसर पडला असून पक्ष धर्माच्या मुद्द्यावर जास्त वेळ घालवत आहे,' असं संघप्रिय गौतम यांचं म्हणणं आहे. तसंच पाच राज्यातील पराभवानंतर मोदी आणि शहांचा करिश्मा चालत नसल्याचं भाजप नेते संघप्रिय गौतम यांना वाटत आहे.

'पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने शिवराज सिंह चौहान यांना राष्ट्रीय अध्यक्ष आणि गडकरींना उपपंतप्रधान करायला हवं. तसंच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्‍यनाथ यांच्याऐवजी राजनाथ सिंह यांना बसवावं, असं मत संघप्रिय गौतम यांनी व्यक्त केलं आहे.

गौतम यांनी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींना एक पत्रही लिहले आहे. '2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान झाल्यावर मोदींनी देशाचं नाव मोठं केलं आहे. तरीही 2019 मध्ये भाजपला जिंकायचं असेल तर पक्षात मोठे बदल करावे लागतील. भाजप कार्यकर्त्यांत देखील सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल मतभेद आहेत,' असं म्हणत गौतम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

VIDEO : विजयाचे बाप अनेक असतात, पराभव अनाथ असतो -नितीन गडकरी

First published: January 6, 2019, 2:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading