नागपूर, 19 जानेवारी : 'नागपुरात जातीचं राजकारण चालत नाही. तसंच माणूस हा जातीने मोठा होत नाही,' असं म्हणत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आपण जात-पात बघत नसल्याचं स्पष्ट केलं. भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेचे नागपुरात आयोजन करण्यात आलं आहे. त्यावेळी बोलताना गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
'माझ्याकडे कुणी जातीचं राजकारण करायला आलं तर त्याला प्रतिसाद दिला जात नाही. नागपुरातील अनुसूचित समाज नेहमी भाजप सोबत राहिला आहे, कारण नागपुरात जातीच राजकारण चालत नाही,' असंही नितीन गडकरी म्हणाले.
'काँग्रेसने आमचा दुष्प्रचार केला'
'भाजप ही उच्च जातीची पार्टी आहे , छुआ छुत केली जाते, असं सांगत आमच्याबद्दल भ्रम पसरवण्यात आला. याबाबत काँग्रेसने आमचा दुष्प्रचार केला,' असा आरोप नितीन गडकरी यांनी केला आहे. मात्र आम्ही सोशल एक्वालिटी वर काम करतो, असंही गडकरी म्हणाले.
गडकरी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
- राजकारणात कन्व्हेंस करणं शक्य नाही तर कंफुज केलं जातं
- माझ्याकडे कोणी जातीचं राजकारण करायला आलं तर त्याला प्रतिसाद दिला जात नाही.
- जुन्या विचारांमुळे अजूनही अनुसूचित जातीचे लोक सोबत यायला संकोच करतात.
- औरंगाबाद विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यात यावं यासाठी लॉंग मार्च काढण्यात आला
- नागपुरात दलित समाजाने आम्हाला नेहमी साथ दिली त्यामुळे नगरपालिका, ग्रामपंचायतसुद्धा आमच्याकडे आहे
- इथे जातीच राजकारण चालत नाही. जातीच्या नावावर कोणी राजकारण केलं तर त्याला खपून घेत नाही.
- समाजातून जाती प्रथा आणि अस्पृश्यता, छुआ छुत नष्ट व्हायला पाहिजे. मी या गोष्टी कधीही मानत नाही. मी जाती धर्माचा कधीही विचार करत नाही.
'सकाळी फक्त खांदा द्यायला या', आत्महत्येच्या तयारीचा VIDEO टाकला इन्स्टाग्रामवर