इंदौर, 17 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM MODI) वाढदिवसाच्या पूर्व संध्येला मध्य प्रदेशला मोठी विकासाची भेट मिळाली. राज्यात एकूण 34 रस्ते प्रकल्प सुरू झाले. या प्रकल्पाची केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उद्घाटन आणि पायाभरणी केली. विशेष म्हणजे गडकरींनी यावेळी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे (Delhi-Mumbai Express-way)ची स्पीड टेस्टही घेतली. ताशी 170 किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या कारमध्ये बसले आणि थर्मस उघडून चहाचा घोटही घेतला.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मध्य प्रदेशला रस्त्यांची भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वेवर स्पीड टेस्टही घेतली. त्यांनी कारमध्ये बसून रस्त्याची गुणवत्ता पाहण्यासाठी स्पीड टेस्ट केली. गडकरींची कार 170 किमीच्या स्पीडनं धावली. हाय स्पीड कारमध्ये त्याने थर्मस उघडून चहाचा ही आनंद घेतला.
महामार्गाचे कौतुक करताना गडकरी म्हणाले की, अगदी लहान विमान देखील या रस्त्यावर उतरू शकतात. या एक्स्प्रेस वे द्वारे, दिल्ली ते मुंबई अगदी अर्ध्या वेळेत म्हणजेच 24 ऐवजी 12 तासात पोहोचता येणार आहे.
गडकरी यांच्याकडून दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी
हा एक्स्प्रेस वे येत्या दोन वर्षांत सुरू होईल आणि दिल्ली ते कटरा (Delhi-Katra) हा प्रवास केवळ सहा तासांत पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच हा मार्ग तयार झाल्यावर दिल्ली मुंबई प्रवास अवघ्या 12 तासांत पूर्ण करता येणार आहे. अन्य काही महामार्ग आणि रस्त्यांबद्दलची माहितीही त्यांनी यावेळी दिली. (Delhi-Mumbai Express Way) हा एक्स्प्रेस वे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांतून महाराष्ट्रात येणार आहे.
हेही वाचा- मुलगा-सुनेच्या छळवणुकीतून वृद्ध दाम्पत्याची सुटका; 10 दिवसात आलिशान घर सोडण्याचे आदेश
परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, या एक्स्प्रेसवेसाठी 98 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. दिल्ली-मुंबई हा 1380 किलोमीटर लांबीचा एक्स्प्रेस वे देशातला सर्वांत जास्त अंतराचा एक्स्प्रेसवे ठरेल. नावाप्रमाणेच हा एक्स्प्रेसवे दिल्ली आणि मुंबई या शहरांची कनेक्टिव्हिटी सुधारेल. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतून हा महामार्ग मुंबईत येईल. त्यामुळे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चितोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, बडोदा, सुरत असे इकॉनॉमिक हब्स एकमेकांशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडले जातील.
हेही वाचा- मोठी बातमी: अभिनेता साहिल खान विरोधात गुन्हा दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'न्यू इंडिया व्हिजन' (New Indian Vision) अंतर्गत दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या कामाची सुरुवात 2018 साली झाली होती. 9 मार्च 2019 रोजी या कामाचं भूमिपूजन झालं होतं. 1380 किलोमीटरपैकी 1200 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या कामाचं काँट्रॅक्ट आधीच देण्यात आलं असून, निर्मितीचं काम वेगानं सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.