नवी दिल्ली, 12 जुलै: पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे
(Rising petrol-diesel prices) नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. परिणामी विरोधी पक्षाकडूनही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत नितीन गडकरी यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. अद्याप सरकारमधील कोणत्याच मंत्र्याने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवर खुलेपणाने बोलणं टाळलं आहे. त्यामुळे गडकरींनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण ठरत आहे. (
Nitin Gadkari on Rising petrol-diesel prices)
गडकरी म्हणाले की, इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांमध्ये संताप, राग आहे. याचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी पर्यायी इंधनाच्या प्रयोगांवर जोर देण्याची गरज व्यक्त आहे. नितीन गडकरी यांनी सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलच्या प्रयोगांवर अधिक लक्ष केंद्रीय करण्याची गरज व्यक्त केली. केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री गडकरी यांनी रविवारी नागपूरमध्ये
(Nagpur) देशातील पहिल्या लिक्विफाइड नैसर्गिक गॅस
(LPG) फिलिंग सेंटरचं उद्घाटन केलं आहे. यावेळी त्यांनी एलएनजी, सीएनजी सारख्या पर्यायी इंधनांचा अधिक उपयोग केल्या पेट्रोलच्या वाढत्या किंमतींपासून दिलासा मिळेल असं सांगितलं. गडकरी पुढे म्हणाले की, वाहनांमध्ये इंधराच्या रुपात इथेनॉलचा उपयोग केल्यास पेट्रोलच्या तुलनेत कमीत कमी 20 रुपये प्रती लिटर वाचवता येईल.
(Nitin Gadkari Big statement about petrol diesel fuel increase)
हे ही वाचा-
VIDEO: लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्यांचा हात; भाजप खासदाराचं विधान
ते पुढे म्हणाले की, त्यांचं मंत्रालय ऑटोमोबाइलची निर्मिती करणाऱ्यांना त्यांच्या उत्पादनात प्रोत्साहन देण्यासाठी फ्लेक्स-फ्यूल इंजनसाठी एका नीतीची घोषणा करू शकेल. हे इंजन एकाहून अधिक इंधन आणि इंधनाच्या मिश्रणावर चालू शकेल. दुसरीकडे इथेनॉल, मिथेनॉल आणि बायो-सीएनजीसारख्या
(Ethanol, methanol and bio-CNG) स्वदेशी इंधन आयातीमध्ये कच्च्या तेलाला स्पर्धा असेल आणि ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य मिळविण्याचा हा एकमेव पर्याय आहे.
नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा बदल केल्यानंतर नितिन गडकरीना मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेज
(MSMEs) मंत्रालयाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून आता ही जबाबदारी भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना देण्यात आला आहे. गडकरींकडून MSME मंत्रालयाची जबाबदारी घेतल्यानंतर काहीजणांना सवाल उपस्थित केले आहे. सोशल मीडियावरही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.