माझ्या 'आयडीयां'ना माझं सरकारच मदत करत नाही - नितिन गडकरी

माझ्या 'आयडीयां'ना माझं सरकारच मदत करत नाही - नितिन गडकरी

'सरकारमधील लोक बैलासारखे मान खाली घालून एकाच चाकोरीत चालतात.'

  • Share this:

प्रविण मुधोळकर, नागपूर 3 मार्च  : आपल्या सडेतोड भाषणासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सरकारला घरचा अहेर दिला. 'मी नागपूर महानगरपालिकेला तसेच अन्य ठिकाणी अनेक चांगल्या आयडीया सूचवित असतो. माझ्या आयडीया फारच फॅनटास्टिक असतात. पण महानगरपालिका तर सोडाच माझ्या आयडीयांना अनेकदा माझे सरकारच मदत करीत नाही. सरकारमधील लोक बैलासारखे मान खाली घालून एकाच चाकोरीत चालतात', असं परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

नागपूर महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर इनोव्हेशन पुरस्कार प्रदान सोहळ्या प्रसंगी गडकरी बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे रविवारी गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला. 'आज आपल्या देशाला इनोव्हेशन्सची खरी गरज आहे. जगातील कोणतीच गोष्ट ही टाकाऊ नसते. त्याचा उपयोग करून अनेक समस्या सोडविता येतात. नागपूर शहरातील सांडपाणी उर्जा प्रकल्पाला विकून त्यातून कोट्यावधी रुपये कमविता येतील ही संकल्पना मी मनपाला दिली.

आज मनपा त्यातून तब्बल ८० कोटी रुपये कमविते आहे. इतकेच नाही जुन्या बसेसना सीएनजी लावून चालविण्याची संकल्पनासुद्धा मी त्यांना दिली. त्यातून त्यांचे सुमारे ६० कोटी रुपये वाचले आहेत. या आणि अशा अनेक संकल्पना मी मनपाला देतो. पण त्या फारशा प्रत्यक्षात उतरत नाहीत. महानगरपालिका तर सोडाच त्यांना अनेकदा माझे सरकारच मदत करीत नाही. सरकारला बैलासारखी मान खाली घालून एकाच चाकोरीत चालायची सवय लागली आहे, असं गडकरी म्हणाले.

First published: March 3, 2019, 11:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading