हायवेवर सुरू करू शकता हे नवे बिझनेस, गडकरींनी केली इ हायवेची घोषणा

हायवेवर सुरू करू शकता हे नवे बिझनेस, गडकरींनी केली इ हायवेची घोषणा

भारतात आता विजेवर चालणारे ट्रक, बसेस येणार आहेत. जर्मनी, स्वीडन आणि कॅलिफॉर्नियासारखंच देशातले हायवे इलेक्ट्रिक हायवेमध्ये रूपांतरित केले जाणार आहेत. मेट्रोप्रमाणेच ट्रक किंवा बसेसही इलेक्ट्रिक केबलवर चालतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जानेवारी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Union minister Nitin Gadkari ) हायवेसाठी नव्या योजना जाहीर केल्या आहेत. पर्यायी इंधन, इलेक्ट्रीक हायवे (Electric Highway)आणि चार्जिंग स्टेशन यासारख्या सुविधांचा यात समावेश आहे. फिक्कीच्या परिषदेमध्ये नितीन गडकरींनी या योजना जाहीर केल्या. यामध्ये एक लाख कोटी रुपयांच्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस राजमार्ग योजनेचाही त्यांनी उल्लेख केला.

हायवे बिझनेस

हायवेवरच्या या योजनांमध्ये LNG स्टेशन, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन किंवा पेट्रोल पंप सुरू करणाऱ्या कंपन्यांना याचा फायदा होऊ शकतो. नितीन गडकरी म्हणाले, आम्ही दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे सह 22 नवे एक्सप्रेस हायवे तयार करतो आहोत. दिल्ली- मुंबई एक्सप्रेस वे 3 वर्षांत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.

(हेही वाचा : 'चेतक' ला गती देणारे राहुल बजाज आता नाहीत सूत्रधार, बोर्डाने केला मोठा बदल)

इलेक्ट्रिक हायवे

दिल्ली- मुंबई एक्सप्रेस वे वर एक इलेक्ट्रिक हायवेची योजना आहे. यासाठी जमीन घेण्याचं काम पूर्ण झालं आहे. इलेक्ट्रिक हायवे पाहण्यासाठी आपण स्वीडनला जाणार आहोत, असंही नितीन गडकरींनी सांगितलं. ई हायवेसाठी त्यांनी गुंतवणूकदारांना आवाहनही केलं आहे.

(हेही वाचा : Brexit : 31 जानेवारीला ब्रिटन EU मधून पडणार बाहेर, भारतावर होणार हा परिणाम)

असे असतात इलेक्ट्रिक हायवे

भारतात आता विजेवर चालणारे ट्रक, बसेस येणार आहेत. जर्मनी, स्वीडन आणि कॅलिफॉर्नियासारखंच देशातले हायवे इलेक्ट्रिक हायवेमध्ये रूपांतरित केले जाणार आहेत. मेट्रोप्रमाणेच ट्रक किंवा बसेसही इलेक्ट्रिक केबलवर चालतील. जर्मनीमध्ये वाढणाऱ्या प्रदूषणावर उपाय काढण्यासाठी इलेक्ट्रिक हायवेच्या यशस्वी चाचण्या करण्यात आल्या. हायवेवर विजेच्या तारा लावण्यात आल्या आणि यातूनच हायब्रिड ट्रकला पॉवर देण्यात आली.अशाच पद्धतीने भारतातही ई हायवे तयार करण्यात येतील, असं नितीन गडकरींनी सांगितलं.

=============================================================================================

First published: January 30, 2020, 7:31 PM IST

ताज्या बातम्या