VIDEO : राहुल आणि गडकरींमध्ये गुफ्तगू, ये दुनिया वाले पूछेंगे, मुलाक़ात हुई क्या बात हुई!

VIDEO : राहुल आणि गडकरींमध्ये गुफ्तगू, ये दुनिया वाले पूछेंगे, मुलाक़ात हुई क्या बात हुई!

  • Share this:

नवी दिल्ली 26 जानेवारी :प्रजासत्ताक दिनाची दिल्लीची परेड ही कायम सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र असतं. या परेडला सर्व गणमान्य व्यक्ती हजर असण हे काही नवं नाही. मात्र दोन विरोधी पक्षांचे नेते जर एकत्र बसले आणि त्यांच्यात गप्पा रंगल्या तर चर्चा ही होणारच.

आजही असच झालं. राजपथावरच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सपत्नीक नातवासह कार्यक्रमाला हजर होते. त्यांच्या शेजारी बसलेली दुसरी अतिमहत्त्वाची व्यक्ती होती काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी. परेडचं निरीक्षण सुरू असतानाच दोनही नेत्यांमध्ये मस्त गप्पांचा फड रंगला होता.

नितीन गडकरी हे बोलण्यात अघळपघळ. त्यांची खास वैदर्भीय स्टाईल. कुठलीही भीडभाड न ठेवता ते मनात येईल ते बोलत असतात. त्यामुळे अनेकदा वादही होतात. यावेळी गप्पांमध्ये त्यांचे दुसरे साथीदार हे राहुल गांधी असल्याने चर्चा झाली नसती तरच नवल.

सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने दोनही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू आहेत. राहुल गांधी आक्रमपणे नरेंद्र मोदींना टार्गेट करताहेत. राफेल वरूनही दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. अशी पार्श्वभूमी असताना हे दोन नेते नेमकं काय बोलत होते याची आता चर्चा सुरू झालीय.

गडकरींच्या कामाच्या धडाक्यामुळे त्यांचे सर्वच पक्षांमध्ये चाहते आहेत. कुठल्याही पक्षांचा खासदार किंवा नेता त्यांच्याकडे आल तर योग्य काम असेल तर ते त्याचं काम लगेच करतात अशीही त्यांची ख्याती आहे. 2019 मध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर NDAमध्ये गडकरींचं नावही समोर येऊ शकतं अशा पार्श्वभूमीवर या गप्पांचा आता राजकीय अर्थ काढला जाणार आहे.

VIDEO: बायकोला प्रियकरासोबत रंगे हात पकडलं, पतीने भर रस्त्यात घातला राडा

First published: January 26, 2019, 7:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading