देशावर गंभीर पाणीसंकट ! 2020 पर्यंत या शहरांमधील पाणी संपणार

देशावर गंभीर पाणीसंकट ! 2020 पर्यंत या शहरांमधील पाणी संपणार

नीती आयोगाच्या Composite water management index मध्ये देशातील पाण्याच्या स्थितीवर माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली: देशात आणि राज्यात भीषण पाणी टंचाई आहे, दुष्काळामुळे पाण्याची तहान ही टँकरवर भागवावी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 'मन की बात'मध्ये पाणी टंचाईवर देशातील जनतेला आवाहन केलं आहे. तर, दुसरीकडे नीती आयोगनं देखील देशातील पाण्याच्या प्रश्नावर काही गंभीर सवाल विचारले आहेत. 2020 पर्यंत देशातील 21 शहरं ही पाणीबाणीच्या ऊंबरठ्यावर असतील तर 2030 पर्यंत देशातील 40 टक्के लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे लोकांना पाणी विकत घ्यावं लागेल. यामध्ये आंध्र प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील काही शहरांचा समावेश आहे. तर, 21 शहरांमधील पाण्यानं 2020 पर्यंत शून्य पातळी गाठलेली असेल.

मोदी 2.0: 'मन की बात'; पाणी संकटावर पंतप्रधानांनी दिला 'हा' सल्ला!

21 शहरांमध्ये गंभीर स्थिती

नीती आयोगाच्या अहवालानुसार देशातील 21 शहरांमध्ये पाण्याची पातळी ही शून्य असेल. त्यामुळे देशातील 10 कोटी लोकांना पाणी संकटाचा सामना करावा लागणार आहे. नीती आयोगाच्या Composite water management index मध्ये देशातील पाण्याच्या स्थितीवर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पटियाला, मोहाली, यमुना नगर, नवी दिल्ली, गाजियाबाद, आग्रा, रतलाम, जयपूर, हैद्राबाद, वेल्लोर, चेन्नई, बंगळूरू, गांधीनंगर, इंदौर, अजमेर, जोधपूर, बिकानेर, गुरूग्राम, लुधियाना, अमृतसर आणि जालंधर या शहरांच्या नावाचा समावेश आहे. तर, 2030 पर्यंत देशातील 40 टक्के लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे लोकांना पाणी विकत घ्यावं लागेल असं देखील म्हटलं आहे.

बँकेतील पैशांना आता कमी व्याज दर? 1 जुलैपासून बदलणार या गोष्टी

मोठ्या प्रमाणावर पाणी जातंय वाया

दरम्यान, देशात अनेक भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. एका व्यक्तीला दिवसाला किमान 25 लिटर पाणी लागतं. त्याच ठिकाणी आता 70 लिटर पाणी वापरलं जात आहे. Indian Health Organisationनं याबाबतची माहिती समोर आणली आहे.

हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं; भाजप आमदार थोडक्यात बचावले, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 07:49 PM IST

ताज्या बातम्या