मराठी बातम्या /बातम्या /देश /नीता अंबानी BHU मध्ये प्रोफेसर म्हणून शिकवणार नाहीत; Reliance चं स्पष्टीकरण

नीता अंबानी BHU मध्ये प्रोफेसर म्हणून शिकवणार नाहीत; Reliance चं स्पष्टीकरण

'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड'च्या (Reliance Industries Limited) कार्यकारी संचालिका नीता अंबानी (Nita Ambani) यांना बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) मानद प्राध्यापक (Visiting Professor) म्हणून नियुक्त करण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं 'रिलायन्स'तर्फे बुधवारी (17 मार्च) स्पष्ट करण्यात आलं.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 17 मार्च : 'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड'च्या (Reliance Industries Limited) कार्यकारी संचालिका नीता अंबानी (Nita Ambani) यांना बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) मानद प्राध्यापक (Visiting Professor) म्हणून नियुक्त करण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं 'रिलायन्स'तर्फे बुधवारी (17 मार्च) स्पष्ट करण्यात आलं. अशा प्रकारचा प्रस्ताव किंवा आमंत्रणपत्र विद्यापीठाकडून पाठवलं गेलं असल्याचा आरोप रिलायन्सतर्फे फेटाळून लावण्यात आला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

  विद्यापीठातल्या वुमन स्टडी सेंटरमध्ये (Women Study Centre) व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून येण्याविषयीचं आमंत्रण विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र (Social Sciences) विभागाकडून नीता अंबानींना पाठवलं गेल्याचं वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिलं होतं. नीता अंबानींना असा प्रस्ताव पाठवण्याच्या विद्यापीठाच्या कृतीला विरोध करण्यासाठी 40हून अधिक विद्यार्थ्यांनी मंगळवारी (16 मार्च) विद्यापीठाचे कुलगुरू राकेश भटनागर (Rakesh Bhatnagar) यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. तसंच, नीता अंबानींना व्याख्यान देण्यासाठी बोलवू नये असं आवाहन करणारं निवेदन दिलं.

  (वाचा - Covid-19 Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन; बुक करा स्लॉट)

  नीता अंबानी यांना असा काही प्रस्ताव पाठवला गेला आहे, याची कुलगुरू भटनागर यांना माहिती नसल्याचं त्यांनी सांगितल्याची माहिती शुभमने माध्यमांना दिली.

  दरम्यान, केवळ नीता अंबानीच नव्हे, तर उद्योगपती गौतम अदानी यांच्या पत्नी प्रीती अदानी आणि ब्रिटनमधले पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल यांच्या पत्नी उषा मित्तल यांनाही असा प्रस्ताव वुमन स्टडी सेंटरकडून पाठवला गेल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. विद्यापीठात सुमारे 20 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या या वुमन स्टडी सेंटरमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसरपदाच्या तीन जागा सध्या रिक्त आहेत. त्यासाठी या तीन उद्योगपतींच्या पत्नींना आमंत्रित करण्यात आलं होतं असं एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं होतं.

  (वाचा - Kalpana Chawla:भारताची पहिली महिला'Space Star';त्यांच्या या गोष्टी माहितीयेत का?)

  'आम्ही महिला सबलीकरण या विषयाच्या अनुषंगाने संशोधन करतो. तसंच पदवी आणि पदव्युत्तर कोर्सेसही येथे उपलब्ध आहेत. दानशूर उद्योगपतींना विद्यापीठाच्या कामात सामावून घेण्याची बनारस हिंदू विद्यापीठाची परंपरा आहे. त्या परंपरेला अनुसरून आम्ही नीता अंबानी यांना वुमन स्टडी सेंटरमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून येण्याचं आमंत्रण देण्याचा प्रस्ताव रिलायन्स फाउंडेशनला पाठवला होता. त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. रिलायन्स फाउंडेशनने महिला सबलीकरण या क्षेत्रात बरंच काम केलं आहे,' अशी भूमिका सोशल सायन्सेस विभागाचे डीन कौशल किशोर मिश्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसकडे मांडली होती.

  First published:

  Tags: India, Nita ambani, Reliance group, Reliance Industries